व्रतविधि – ज्येष्ठ शु. ४ दिनीं या व्रतिकांनीं एकमुक्ति करावी आणि ५ दिवशीं प्रातःकाळीं सुस्खोष्ण जलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौतवने धारण करावींत. सर्व पूजा द्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्पक जिनेंद्रास मक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. पीठावर पद्मप्रभ तीर्थंकर प्रतिमा कुसुमवर यक्ष व मनोवेगा बक्षीसह स्थापून त्यांना पंचामृतांनी अभिषेक करावा, अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुत व गणधर यांची पूजा करून देवापुढे एका पाटावर सहा पाने मांडून त्यांवर अक्षता, फळं, फुके नेवेचे वगैरे ठेवून श्री, ही, ध्रुवि, कीर्ति, बुद्धि, व लक्ष्मी या सहा देवतांचे अर्चन कराने, यक्ष, यक्षी व बन्धुदेव यांचे अर्चन करावे. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं पद्मप्रभ -तीर्थंकराय कुसुमवरयक्षमनोवेगायक्षीसहिताय नमः स्वाहा ।। या मंत्राने १०८ पुष्ये घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां एक जप करावा. दी व्रतकथा वाचावी. एका पात्रांत सहा पार्ने लावून त्यांवर अष्टद्रव्ये व एक नारळ ठेवून महार्थ करावे. त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्यादिवशी उपवास करावा. सत्पात्रांत आहारदान द्यावें. दुसरे दिवशीं पूजा व दान करून पारणे करावे. तीन दिवस ब्रम्हचर्यपूर्वक वर्मध्यानांत घालवावेत.
या जंबूद्वीपांतील धातकी खंडात मेरू पर्वाच्या पश्चिमेस विदेह क्षेत्र आहे, त्यांतील दासीका नदीच्या सीमेवर वत्स नामक विस्तीर्ण देश आहे. त्यांमध्ये सुसीमा नांवाची मनोहर नगरी आहे. तेथे पूर्वी अपराजित नांवाचा पराक्रमी, नीतिमान् व धार्मिक नसा राजा राज्य करीत होता. त्याका लक्ष्मीमती नामे सुशील, गुणवत्ती धर्मपत्नि होती. जणूं काय ? स्वरूपार्ने लक्ष्मीच आहे कीं काय ? अशी शोभत होती. त्यांना सुमित्र नांवाचा एक सुंदर पुत्र होता. शिवाय मंत्री, पुरोहित, श्रेष्ठी, सेनापति इत्यादिच्या परिवारासह तो सुखाने आनंदविलासामध्ये काल घालवीत होता.