वैशाख शु. ३ पासून प्रपर्यंत पांच दिवस या व्रतधारकांनी स्नानादिकांनी शुचिर्भूत होऊन शुद्ध मनानें श्रीजिनमंदिरांस जावें. तेथे गेल्यावर मंदिरासमेत हो प्रदक्षिणा घादन ईर्यापथशुध्यादि क्रिया कराव्यात. मग यक्षयक्षीसह श्रीवृषभनाथ तीर्थकर प्रतिमा सिंहास- नावर स्थापन करून तिला पंचामृतांनी अभिषेक करावा. नंतर अष्टक, स्तोत्र, जयमाला हीं म्हणत आठ द्रव्यांनी अर्चना करावी. मग सरस्वती व गणधर यांची पूजा करावी. ” ॥ ॐ न्हीं श्रीं क्लीं ऐं अई आदि- नाथतीर्थकराय गोमुखचक्रेश्वरी यक्षयक्षीसहिताय नमः स्वाहा ॥”
या मंत्राने १०८ पुष्पें घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. नंतर व्रतकथा ऐकावी अथवा वाचावी. मग एका ताटांत नऊ पार्ने, गंध, अक्षता, फुळे फर्डे वगैरे द्रव्ये ठेवून ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालाव्यात. नंतर आरती करावी. पांच दिवस एकमुक्ति करावी. मुनीश्वरादिकांस आहारदान देऊन आपण पारणा करावी.
या क्रमाने हे व्रत पांच वर्षे करावें. शेवटीं एक नवदेवताची प्रतिमा तयार करवून त्याची प्रतिष्ठा पूजा करून यथाशक्ति उद्यापन करावे. असा या व्रताचा विधि आहे.
कथा –
या जंबूद्वीपांत भरत नांवाचें एक क्षेत्र असून त्यांत राजग्रद्द नांवाचें एक नगर आहे. त्यामध्यें पूर्वी मेघनाद या नांवाचा एक महामंडलेश्वर राजा राज्य करीत असें. तो मुदनासारखा रूपवान् आणि शत्रूचा मस्तकाला केवळ शूलच होता; अर्थात् त्यांस पाइतांच शत्रूच्या मस्तकीं शूल उत्पन्न होय असे. त्याला पृथ्वीदेवी नांत्राची पट्टराणी होती. ती मोठी रूपवती, जिनधर्म प्रभाविनी व सम्यक्त्वचूडामणी होती इच्यासह तो मैघनाद राजा सुख, संकथा व विनोदांनीं राज्य करीत होता. एके दिवशी त्याची ती पृथ्वी महादेवि आपल्या विलासिनी देवीसह आपापल्या सात मजल्याच्या माडीवर दिशावलोकन करीत आनं- दानें बसली असतां कित्येक विद्यार्थी बालक पाठशाळेत उपाध्यायांसमीप विद्याभ्यास करून आपापल्या घरी चालले होते. तेव्हां ते सगळे आपल्या अंगीं धूळीमाखून घेऊन परस्परासी विनोद गोष्टी करीत निघाले होते. त्या पुत्रांस पाहून तिला वाटलें कीं; – आतां आपल्याला पुत्र नाहीं. म्हणून हा आपला स्त्रीजन्म अगदीं निरर्थक आहे. याप्रमाणें तिच्या मनांत तळमळ उत्पन्न झाल्यामुळे ती तेथून खालीं येऊन आपल्या शय्यागृहांतील शय्येवर चिंतारूपी समुद्रांत मग्न होऊन निजली होती. तेव्हां तो मेघनाद राजा ती चिंताकुळ होऊन निजली आहे, असें पाहून तिला अत्यंत प्रेमानें म्हणाला; – हे प्रिये ! आतां तुला कशाची चिंता लागली आहे ? तेव्हां ती राणी त्यांत म्हणाली; हे स्वामिन् प्राणपते ! आपणांस पुत्र नाहींत; तर आपले हे सर्व राज्यवैभव व्यर्थ आहे. हे तिचे दुःखद भाषण ऐकून त्यालाहि अत्यंत वाईट वाटलें. मग त्यानें तिला अनेक प्रकारच्या समाधानाच्या चार गोष्टी सांगून संतुष्ट केलें.
नंतर कित्येक दिवस गेल्यावर त्या नगराच्या बहिरुद्यानवनांतील सिद्धकूट चैत्यालयाची वंदना करण्याच्या निमित्तानें पूर्वविदेह क्षेत्रां- तील सुप्रभनामक एक चारण सुनीश्वर आकाशमार्गातून खालीं उत- रखें; आणि ते त्या जिनालयांतील श्रीजिनेंद्रबिंबास वंदना करण्या- साठीं आंत गेलें. तेव्हां तेथील वनपालकानें त्यांस पाहून फलपुष्पादिक आपल्या हातीं घेऊन तो राज सर्भेत गेला. आणि राजापुढें तीं ठेवून त्यांस त्यानें चारणमुनि तेथें आल्याची शुभवार्ता कळविली. ती ऐक- तांच तो राजा आपल्या मनांत हर्ष भरित होऊन सिंहासनावरून उत- रून त्या दिशेस सात पाऊलें जाऊन साष्ठांग नमस्कार करतां झालाः आणि आपल्या आंगावरील वस्त्राभरणें त्या वनपालांत देता झाला.
त्यानंतर तो नगरांमध्यें उद्यानांत चारणमुनि आल्याची आनंद मेरी पिटवून आपल्या सर्व परिजन पुरजनांसह पादमार्गानें त्या उद्यानास गेला. मग तेथे तो सर्वांसह त्या जिनचैत्यालयांस तीन प्रदक्षिणा घालून आंत प्रवेशळा; आणि त्यांनीं श्रीजिनेंद्राचें वस्तुस्तवन रूपस्तवन व गुणस्तवन करून त्यांस साष्टांग नमस्कार केला. मग त्यानें श्रीजिने- श्वराच्या प्रतिबिंबास पंचामृत अभिषेक करून अष्टविधार्चन केलें. नंतर तो सर्वासह त्या सुप्रभ मुनीश्वरांस नमस्कार करून त्यांच्या समीप जाऊन बसला. त्या मुनीशांच्या मुखानें कांहीं वेळ सर्वांनी निर्मळ मनानें धर्मोपदेश ऐकला.
नंतर त्या राजाची प्रियपत्नी पृथ्वीमहादेवी ही आपलीं दोन्हीं करकमळे जोडून विनयानें त्या चारण मुनीश्वरांस म्हणाली;- मो
स्वामिवर्थ ! या भवांत मजला सर्व सुख सौभाग्य प्राप्त झाले आहे; परंतु आमच्या पोटीं संतान नसल्यामुळे आमचा हा सर्व जन्म निरर्थक आहे. हे तिचे बचन ऐकून ते चारण महामुनि म्हणाले:- हे महादेवि ! तुमच्या मागच्या भवांतील अंतरायकर्माच्या उदयामुळे आतां तुम्हांस पुत्र संतान झाला नाहीं. तेव्हां ती म्हणाली, भो मुनि महाराज ! आपण माझा मागचा भव प्रपंच काय असेल तो सांगावा. हे तिचें भाषण ऐकून ते मुनीश्वर म्हणाले; हे देवि ! आतां मी तुमचा मागील भव प्रपंच सांगतो लक्ष देऊन ऐका; –
या भरत क्षेत्रांत काश्मीर नांवाचा एक विशाल देश आहे. त्या देशांत रत्नसंचय नांवाचें एक सुंदर नगर आहे. तेथे पूर्वी वैश्यकुळांत उत्पन्न झालेला श्रीवत्स या नांवाचा एक राजश्रेष्ठि राहत असे. त्याला श्रीमती नामें एक सुंदर व गुणवती भार्या होती. तिच्यासह तो सुखानें नांदत असतां त्या पट्टणांतील श्रीजिनचैत्यालयाची वंदना करण्या- साठीं मुनिगुप्त नांवाचें दिव्यज्ञानधारी महामुनि पांचशें मुनिसमुदायांसह तेथें आले. मुनिसमुदायांस पहतांच त्या राजश्रेष्टिस वाटलें कीं; –
आज आमचा जन्म सफल झाला. मग तो मोठ्या आनंदानें मुनी- श्वरांत नमोस्तु करून त्याचें प्रतिग्रहण करून आपल्या गृहीं घेऊन गेला. तेव्हां तेथे आपल्या श्रीमति नामक पत्नीस त्यानें आहाराची व्यवस्था करण्याविषयीं आज्ञा केली असतांहि ती कांहीं केली नाहीं, म्हणून आपल्या मनांत अतिशय तळमळला आणि तो स्वतः अनेक पकानें तयार करून, सप्तगुणांनीं युक्त होत्साता नवविधभक्तीनें त्यांस आहार- दान देतां झाला. त्या सर्वांचा निरंतराय आहार झाल्यामुळे ते सगळे संतुष्ट होऊन त्या श्रेष्ठीस ‘अक्षयदानमस्तु’ असा आशिर्वाद देऊन तेथून निघून गेले. तेव्हां त्या श्रीमतीच्या मनांत क्रोध, लोभ उत्पन्न झाल्यामुळे तिला अंतराय कर्माचा बंध पडला. म्हणून आतां या भवांत पुत्रसंतान नष्ट झाला आहे.
हे सुर्माच्या मुखानें बचन ऐकून ती अतिशय दुःखी झाली. मंगा तो त्या मुनीश्चरांस म्हणाली, हे स्वामिराज! आतां त्या पूर्वीच्या अज्ञानाने केलेल्या पापांचा क्षय होण्याकरितां आणि पुत्रसंतान होण्यासाठी मला आज आपण एकादा उपाय सांगावा. हे तिचे बच्चन ऐकून ते म्हणाले;-
हे महादेवि ! तूं आतां सर्व सुखाला कारणीभूत असे हैं अक्षय. वृत्तीयाव्रत विधिपूर्वक पालन कर; म्हणजे त्या योगानें तुजला सर्व इष्ट घुले अवश्य प्राप्त होतील. असे म्हणून त्यांनी तिला सर्व विधी सांगितला. ते सर्व ऐकून ती पृथ्वीदेवि पुनः त्या सुप्रभ मुनीश्वरांस म्हणाली; हे स्वामिवर्य ! हे व्रत पूर्वकाळी कोणी पाउन केलें आहे ? हे तिचें भाषण ऐकून ते मुनींद्र म्हणालें; हे देवी! त्या व्रताची कथा आतां तुला मी सांगतो ऐक; –
या जंबू द्वीपांत भरत क्षेत्र असून त्यांत मगध नांवाचा एक विशाल देश आहे. त्या देशांतील एका नदीच्या तीरावर एक सहस्रकूट चैत्यालय आहे. त्या चैत्यालयाची वंदना करण्याच्या निमित्तानें एक धनिक नांवाचा वैश्य आपल्या सुंदरी नामें भार्येसहित गेला होता. तेव्हां तेथे एक कुंडलमंडित या नांवाचा विद्याधर व त्याची भार्या मनोरमा देवी. हे दोघे या व्रताचें विधान करीत होते. त्यावेळीं श्रेष्ठीची भार्या सुंदरादेवी ही त्या मनोरमेस विचारूं लागली कीं; – अहो बाई ! हें तुम्ही काय करीत आहात ? तेव्हां ती मनोरमादेवी तिला म्हणाली; – अहो बाई ! सांगतो ऐका.
या अवसर्पिणी काळांत अयोध्या पट्टणामध्ये पूर्वी नाभिराज या नांवाचें अंतिम मनु झाले. त्यांना मरुदेवी नांवाची पट्टराणी होती. त्यांच्या गर्मी जेव्हां आदिपरमेश्वर अवतरले तेव्हां त्याचें गर्भकल्याण झालें. त्यानंतर त्यांच्या जन्मकाळीं जन्मकल्याण झालें. पुढे दीक्षा- कल्याण झाल्यावर सहा महिनेपर्यंत तपश्चरण करूं लागले. सहा महिने पूर्ण होतांच चर्या मार्गानें पारणेकरितां ग्राम, नगर, खेड इत्यादि स्थली हिंडूं लागले. तेव्हां तेथीउ राजादि भाविक जनांनी आहारदानविधि माहित नसल्यामुळे धन, कन्या, वाइनादि वस्तु त्यांच्या पुढे आणून समर्पण केल्या. त्यावेळी अंतराय झाल्या कारणानें पुनः ते परत वनांत जाऊन सहा महिनेपर्यंत तपश्चर्या करीत राहिले. मग ते सहा महिने पूर्ण झाल्यावर पुनः पारणा करण्यासाठीं चर्या मार्गानें ग्राम, नगरादिकांतून कुरुजांगल नामक देशांत गेले. तेव्हां त्या देशांतील हस्तिनापुर नगरामध्ये कुरुवंश शिरोमणि सोमप्रभ या नांवाचा राजा राज्य करीत होता. त्याला श्रेयांस नांवाच्या एक बंधु होता. तो सर्वार्थसिद्धि नामक स्वर्गातून येऊन तेथे जन्मला होता.
एकेदिवशीं तो रात्रीं निजला असतां रात्रींच्या शेवटच्या प्रहरी त्याला कांहीं स्वप्नें पडली. त्यांमध्ये मंदिरादि, कल्पवृक्ष, सिंह, वृषभ, चंद्र, सूर्य, समुद्र आठ मंगलद्रव्यें ही आपल्या प्रासादा- पुढें (राजावाड्यापुढें) येऊन उभी राहिली आहेत, असे पाहिलें. नंतर त्यानें प्रभातीं उठून हीं शुभ स्वप्नें आपल्या ज्येष्ठ बंधूस सांगि- तली. तेव्हां त्या सोमप्रभ राजानें आपल्या विद्वान् पुरोहितांस बोलावून आणून त्या स्वप्नांची फळे विचारली. मग तो म्हणाला;- हे महाराज ! आज आपल्या गृहीं श्रीआदिनाथ भगवान् पारणे- करितां येतील. हें त्याचें वचन ऐकूनत्या सर्वांस अतिशय आनंद झाला.
इकडे ते भगवान् आहारासाठीं हिंडत असलेले पुरुपरमेश्वर ईर्यासमितीनें अर्थात् युगांतर ( चार हात) भूमी अवलोकित त्या नगरींत प्रासादासमोर आले. तेव्हां जणूं सिद्धार्थ कल्पवृक्षच आपल्या समोर आला कीं काय ? असें त्या सर्वांना वाटलें. तेव्हां त्या आदिनाथ स्वामीचे श्रीमुख पाहतां क्षर्णीच त्या श्रेयांस राजाला आपण पूर्वभवांत श्रीमती वज्रजंघ असतांना एका सरोवराच्या काठीं दोवा चारण मुनीश्वरांस आहारदान दिल्याचे जातिस्मरण झालें. त्या योगानें आहारदानाचा विधि सर्व जाणून त्या आदिनाथ स्वामींस त्यानें योग्य रीतीनें तीन प्रदक्षिणा देऊन त्याचे प्रतिग्रहण करून त्यांस भोजनगृही नेले. तेथे मथमदानविधिकर्ता आणि दाता तो श्रेयांस व त्यांची धर्मपत्नी सुमतिदेवी आणि त्यांच्या ज्येष्ठबंधु सोमप्रभ राजा व त्याची राणी लक्ष्मीमती महादेवी यां सर्वांनी मिळून त्या श्रीआदिनाथ विभूस सुवर्ण कलशांतून तीन खंडी उत्तम असा प्रासुक इक्षुरसांचा आहार, नवधाभक्तीनें दिला. त्यावेळी त्यांच्या हातांतून त्या इक्षुरसांतील एक खंडी रस स्रवून गेला. आणि दोन खंडी रस आहार त्यांच्या उदरांत गेल्यामुळे त्यांची भिक्षा पूर्ण निरंतराय झाली. त्यायोगानें स्वर्गातलि देवांस अत्यानंद झाल्यानें त्यांनी तेथे पंचाश्वर्य दृष्टि केली. सर्वांस मोठा हर्ष झाला. भिक्षा करून जातांना ते पुरुपरमेश्वर सर्व दातृजनांस ‘अक्षयदानमस्तु’ असा शुभाशिर्वाद देऊन आपल्या स्थानीं निघून गेले. त्या कारणानें त्या काळापासून ‘ अक्षयतृतीया’ म्हणून ही पुण्यतिथी प्रसिद्ध झाली आहे. श्रेयांस राजानें आदितीर्थेश्वरांस आहारदान देऊन दानोन्नति केली. हा दानमुख्य झाला. असें समजून भरत चक्रवर्ती व त्यांचे अकंपनादि राजपुत्र हे सर्व इस्तिनापुरीं जाऊन त्यांचा आदरानें सन्मान करून आपल्या अयोध्या नगरीस गेले.
ही सर्व कथा सुप्रभ नामें चारणमुनींच्या मुखें ती पृथ्वीदेवी एकाग्र मनाने ऐकून अत्यंत संतुष्ट झाली. मग त्या सुनींद्रास नमस्कार करून ते व्रत ग्रहण करून सर्व जनांसहित आपल्या घरी आली. तिनें तें व्रत कालानुसार विधिपूर्वक पालन करून त्याचे उद्यापन केले. त्या योगानें ती शुभलक्षणयुक्त बत्तीस पुत्र व बत्तीस कन्या प्रसवली आणि धनकनकादि संपत्तीनीं समृद्ध होऊन पुष्कळ काळपर्यंत आपल्या- पतीसह राज्यैश्वर्य भोगली. शेवटी ती दंपती वैराग्यपर होऊन जिन- दीक्षा धारण करून तपश्चर्या करती झाली व त्या तपोबलानें क्रमानें अक्षयानंत सुख मिळविती झाली.
याकरितों हे भाविकजन हो। तुम्हीही हे अक्षयतृतीया नरा विविपूर्वक यथाशक्ति पाउन करा. म्हणने तुम्हांसहि अक्षयसुख क्रमानें अवश्य मिळेल.