व्रतविधी-आषाढ, कार्तिक, फाल्गुन या महिन्यांतील कोणत्याहि एका सपमी दिवशी व्रतधारकांनीं प्रातःकाळीं सुखोष्ण जलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढवौत बखें धारण करावींत. सर्व पूजा साहित्य आपल्या हातीं घेऊन जिनालयात जावें. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा करून ईर्यापर्थशुद्धयादि क्रिया कराव्यात. देवापुढें नंदादीप लावावा. श्रीपीठावर श्रीवृषभनाथ प्रतिमा यक्षयक्षीसहित स्थापून तिचा पंचामृतांनी अभिषेक करावा. त्यांची अष्टद्रव्यांनीं पूजा क़राबो. ॐ हीं श्रीं क्लीं ऐं अई वृषभनाथाय गोमुख यक्ष- चक्रेश्वरी यक्षीसहिताय सर्वकर्मविनाशनाय सर्वशांतिं कुरु २ स्वाहा ।। १०८ ।। या मंत्रानें १०८ सुगंधी पुष्पें घालून णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. नंतर श्रुत व गुरु यांची अर्चना करावी. यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे यथोचित मंत्रानें अर्चन करावें. देवापुढें एका पाटावर पानें, अक्षतपुंज, सुपाऱ्या, पुष्पें वगैरे प्रत्येकी सात सात लावून ठेवावें. पांच प्रकारचे भक्ष्य तयार करून अर्पण करावें. व्रतकथा वाचावी.
या क्रमाने चार महिनें त्याच तिथीस पूजा करावी. याप्रमाणें चार महिने पूर्ण झाल्यावर आदिनाथ तीर्थकरांस महाभिषेक करून भक्तामरविधान करावें. पंचविध भक्ष्यें, पायस वगैरे पंचपक्वान्नांचे पांच महाचरु करून अर्पण करावेत. ब्रम्हदेवास ब्रम्हवत्र द्यावें. सरस्वतीस श्रुतवस्त्र पांचसंघमुनीश्वरांस पुस्तकें, पिंछी, कमंडलु वगैरे आवश्यक वस्तु बाव्यात. चतुः संघास चतुर्विध दानें द्यार्थीत. पांच सुवासिनी स्त्रियांस आपल्या घरीं भोजन करवून वस्त्रादिकांनीं त्यांचा सन्मान करावा. दीन,
अनाथ जनांस अन्न, वस्त्रं द्यावींत. असा या व्रताचा विधी आहे.
– कथा –
या जंबूद्वीपांतील भरतक्षेत्रांत आर्यखंड आहे. त्याच्या उत्तर- भागीं नेपाल नांवाचा एक विशाल देश आहे. त्यांत पंचपूर या नांवाचें एक सुंदर पट्टण आहे. तेथे पूर्वी योग नांवाचा एक पराक्रमी, गुणवान् व नीतिमान् असा राजा राज्य करीत होता. त्याला योगवती नांवाची एक रूपवती, गुणवती पट्टस्त्री होती. इच्यासह तो राजा सुखानें राज्योपभोग घेत होता.
पुढें कांहीं दिवसांनीं त्या राणीस गर्भ राहिला. नवमास पूर्ण होताच, तिला एक सुंदर, रूपवान् असा पुत्र जन्मला. पण तो पांच वर्षेपर्यंत आपल्या मातापित्यांस अनेक प्रकारें बालक्रीडा दाखवून कोण- त्याहि निमित्तानें सहसा मरण पावला. तेव्हां त्या पुत्राच्या दुःखानें ती राणी चिंताक्रांत होऊन राहिली.
त्या समयीं त्या नगराच्या उद्यान बनांत त्रिलोकप्रज्ञप्ति या नांवाचे एक मुनीश्वर येऊन उतरले. तेव्हां त्यांच्या आगमनामुळे तें वन सर्वत्र मनोहर अशा फलपुष्पांनीं भरित झालें आणि त्यायोगानें तें जिकडे तिकडे शोभायमान दिसूं लागलें. तेव्हां बनपालकानें त्या बनांतील अनेक फल पुष्पें एका पात्रांत घेऊन त्या राजसभेत येता चाला. मग तीं राजापुढें ठेवून आदरानें आपले करद्वय जोडून त्यांस म्हणाला- हे राजेंद्रा ! आज आपल्या भाग्योदयाने या आपल्या ०णाच्या उद्यानांत एक दिव्यज्ञानी महामुनि आले आहेत. ही शुभवार्ता व्याच्या मुखानें ऐकतांच त्या राजांस अत्यानंद झाला. तेव्हां तो तत्काळ आपल्या सिंहासनावरून उठून त्या दिशेला सात पर्दे पुढे जाऊन व्या मुनीस परोक्ष साष्टांग नमस्कार करता शाळा; आणि आफ्या अंगावरील बत्राभरणे उतरून त्या बनपाळकास देता झाला. तसेच आपल्या पट्टणांत आनंदमेरी देववून सर्व परिजन व पुरजन यांच्यासह तो राजा पादमार्गानें त्या मुनीश्वरांच्या दर्शनास गेला. तेथे गेल्यावर तो सर्व जनासह त्यांच्या चरणांस भक्तीनें साष्टांग नमस्कार करून अष्ट- द्रव्यांनी अर्चना करून त्यांच्या समीप जाऊन धर्मोपदेश ऐकत बसळा. त्यांच्यामुखें कांही वेळ धर्मश्रवण केल्यानंतर त्या राजाची प्रियपत्नि योगवती ही आपली दोनी करकमले जोडून त्या मुनीश्वरांस आदरार्ने म्हणाली, भो संसारदुःखनिवारक महामुने ! आम्हांस आर्ता पुत्रदु ख झाले आहे आणि त्याशिवाय मला धर्मसंतान कांहीं नाहीं म्हणून अत्यंत दुःख होत आहे. हे तिचे दुःखद वचन ऐकून ते दिव्यज्ञानी मुनीश्वर तिला म्हणाले- हे कन्ये! या संसारी जीवांच्या ठिकाणी सुख दुःखाचे तरंग निरंतर उत्पन्न होतातच. याकरितां त्या जीवांना हा दयामय धर्मच शरण आहे. यास्तव तूं आतां हैं दुःखे करावयाचे सोडून दे, आणि मी तुला सांगतो असा उपाय कर. तो उपाय हा कीं, आर्ता तूं अधिकसप्तमी व्रत ग्रहण करून भक्तीनें यथाविधी पालन कर आणि अंतीं त्याचे उद्यापनहि कर. म्हणजे त्याच्या योगानें तुला सर्व सुखें अवश्य प्राप्त होतील. कारण हे व्रत या संसारांतील जीवांना अनेक सुखें देण्यास समर्थ आहे. हे त्या मुनीश्वरांचे बचन ऐकून तिला अत्यंत आनंद झाला. मग ती त्यांस म्हणाली- हे स्वामिन् ! आर्ता आपण या व्रताचे विधान मला पूर्ण सांगावें. म्हणजे मी हें व्रत अवश्य पालन करिते. हे तिचे भाषण ऐकून त्या मुनींद्रांनीं व्रताचा विधि व काळ समजावून सांगितला.
ते सर्व विधान त्या मुनीशांच्या मुखें ऐकून त्या राजादिकांस अत्यंत आनंद झाला. नंतर त्या राणीनें त्या मुनींस वंदन करून तें व्रत स्वीकारिलें आणि घरी येऊन ते यथाविधि पालन करून त्याचें उद्यापन केलें. त्या कारणानें त्या दंपतीस पुढें अनेक प्रकारचें सुख प्राप्त झालें. त्यांची इच्छा पूर्ण झाली.
या करितां हे भाविकजन हो ! तुम्हीही हें आधकसप्तमी व्रत विधिपूर्वक यथाशक्ति पालन करा. म्हणजे तुम्हांसही सर्व सुखें अवश्य मिळतील.