व्रतविधि – भाद्रपद शु० ३ दिवशीं या व्रतिकांनीं प्रातःकाळी प्रासुक पाण्यानें अभ्यंगस्नान करून आंगावर दृढधौत वस्खें घ्यावीत. सर्व पूजा सामुग्री आपल्या हातीं घेऊन चैत्यालयास जावें. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धि वगैरे क्रिया कराव्यात. श्रीजिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. श्रीपीठावर श्रेयांस तीर्थ- कर प्रतिमा कुमार यक्ष व गौरी यक्षीसहित स्थापून त्यांचा पंचामृ- तांनीं अभिषेक करावा. नंतर देवापुढें एका पाटावर सोळा १६ पाने क्रमाने मांडून त्यांवर गंधाक्षता, पुष्पें, फळे, केळी, तिळाचे लाडू, राळ्याच्य पीठाचे लाडू, साईचणक (भिजविलेले हरभरे) नारळ, उपवीट सूत्रे, वाळितोड (कर्णपाद भूषणे) काळेमणी इत्यादि ठेवावेत. आदि नाथ ते शांतिनाथापर्यंत सोळा तीर्थकरांची अष्टद्रव्यांनी अष्टके स्तोत्रे, जयमाला म्हणत अर्चना करावी. मग श्रुत व गुरु यांची पूज करावी. कुमार यक्ष व गौरी यक्षी, ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे
श्रीजिनसहस्रनामस्तोत्र म्हणून श्रेयोजिनेंद्र चरित्र वाचायें. व्रतकथा वाचावी. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. एका ताटांत १६ सोळा पार्ने छावून त्यांवर अष्टद्रव्यें ठेवून महार्घ्य करून त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगळारती करावी. बेळवाच्या सूपांत गंधाक्षता, फल, पुष्पें, नारळ, चरु वगैरे घालून पांच वायनें तयार करून त्यांपैकी देवापुढें एक, श्रुत व गुरुपुढें एक, यक्ष व यक्षीपुढे एक ठेवावे व सुवासिनी खीस एक द्यावें, आणि आपण एक घ्यावे. नंतर घरी जाऊन सत्पात्रांस आहारदान देऊन आपण एकमुक्ति करावी.
या प्रमाणे हे व्रत १६ वर्षे करून त्याचे उद्यापन करावें. त्यावेळी श्रेयोजिनेंद्र विधान करून चतुःसंघास आहारादि दानें द्यावीत. १६ सोळा सुवासिनी स्त्रियांस आपल्या घरीं भोजन करवून त्यांचा तांबूल, फल, वस्त्रादिकांनी सन्मान करावा. असा या व्रताचा पूर्ण विधि आहे.
– कथा –
या जंबूद्वीपांतील भरतक्षेत्रांत सिंहपूर नामक एक अति मनो- हर पट्टण होते. तेथे पूर्वी धर्मसेन या नांवाचा एक शूर, धार्मिक, गुणवान् असा राजा राज्य करीत होता. त्याला नंदावती नाम्नी रूप- वती व गुणवती अशी एक पट्टस्त्री होती. शिवाय अनेक सुंदर स्त्रिया होत्या. त्यांना जयकुमार नांवाचा एक गुणवंत पुत्र होता. यासर्वासह तो सुखानें विनोदांत राज्योपभोग घेत होता.
एकदां हा जयकुमार राजपुत्र श्रेयांस तीर्थकरांच्या दिव्यसमव- सरणांत गेला होता. तेथे त्या जिनेश्वरांच्या दिव्यध्वनीचा धर्मोपदेश ऐकल्यावर तो तेथील गणधर स्वामींस आपले दोन्ही हात जोडून विन- यानें म्हणाला- हे दयाघन स्वामिन् ! गौरीव्रत हे पूर्वी कोणी पाठन केलें ? त्या योगे त्यांना काय फलप्राप्ति झाली? याविषयीं मला कथा सांगावी. हे त्यांचे नम्र वचन ऐकून गणधर स्वामी म्हणाले-या जंबूद्वीपांतील भरतक्षेत्रांत कांभोज नांवाचा एक विस्तीर्ण देश आहे. त्यांत उज्जयनी नांवाची एक सुंदर नगरी होती. तेथे श्रेयोराज या नांवाचा एक राजा राज्य करीत होता. त्याला श्रीमती नांवाची एक सुशील, सदाचारी, गुणी पट्टणी होती. तिच्यासह तो राजा हास्यविनोदानें सुखांत राज्यैश्वर्य भोगीत असतां एके दिवशी त्या नगराच्या बाहेरील उद्यानांत कंडू नामादि पुष्कळ तपोधनासह श्रेयोमुनींद्र येऊन उतरले.
ही शुभवार्ता वनपालकाकडून समजतांच तो आपल्या परिवारांसह पादमार्गे त्यांच्या दर्शनास गेला. तेथे गेल्यावर त्यांना तीन प्रदक्षिणा घालून नमन करून अष्टद्रव्यांनी पादपूजा करता झाला. मग त्यांच्या संनिध बसून कांहीं वेळ धर्मोपदेश ऐकल्यावर श्रीमतीराणी प्रार्थना करून मुनींद्रांस म्ह- णाली-हे दयासागर गुरुराज ! आज आपण मला सकल्सौभाग्यदायक असे एकादें व्रतविधान निरूपण करावें. हें तिचें नम्र वचन ऐकून ते मुनीश्वर म्हणाले – हे कन्ये ! आतां तुला गौरीव्रत हें करण्यास योग्य आहे. हे व्रत जे भव्यजीव पालन करितात. त्यांना ऐहिक सर्व सौभाग्य प्राप्त होऊन पारमार्थिक सुखसौभाग्यहि मिळतें. असे या व्रताचें महात्म्य आहे. पूर्वी हैं व्रत रुक्मीणी, श्रीमती, पद्मावती, लक्ष्मीमती, शिवदेवि अशा अनेक साध्वी स्त्रियांनीं पालन करून सकलसौभाग्याची प्राप्ती करून घेतली आहे. वगैरे सांगून या व्रताचा विधि मुनीश्वरांनी सांगितला.
याप्रमाणें सर्व व्रतविधि व दृष्टांत ऐकून श्रीमती वगैरे सर्व जनांस फारच आनंद झाला. मग त्या श्रीमती राणीनें त्या श्रेयो मुनींद्रास प्रार्थना करून हे व्रत घेतलें. नंतर सर्वजन मुनींना नमस्कार करून आपल्या नगरी परत आले. पुढें कालानुसार त्या श्रीमती राणीनें हे व्रत यथाविधी पाळून त्याचें उद्यापन केलें. त्या व्रतपुण्योदयानें तिला
ऐद्धिक सर्व सौभाग्य प्राप्त होऊन क्रमानें खिडिंगाचा परिहार होऊन शाश्वतसुखसौभाग्य प्रात झाले.
याकरितां है भन्यात्म्यांनो ! तुम्हीही हैं व्रत यथाविधी पाळून त्याचे उयापन करा म्हणजे तुम्हांसही अखंड सौभाग्य प्राप्त होईल.