व्रतविधि-आपाढ, कार्तिक व फाल्गुन या तीन मासांत येणाऱ्या कोणत्याहि नंदीश्वर पर्वातील अष्टमी दिवशी या व्रतधारकांनी प्रभाती शुचि जलानें अभ्यंगस्नान करून दृढधौत बखें धारण करावींत. सर्व पूजा साहित्य आपल्या हातीं घेऊन जिनालयीं जावें. तेथे गेल्यावर ईर्थापथ शुध्यादि क्रिया करून जिनेंद्रास भक्तीनें नमस्कार करावा. श्रीपीठावर चोवीस तीर्थकरप्रतिमा स्थापन करून पंचामृताचा अभिषेक करावा. चोवीस तीर्थकरांची अष्टके, स्तोत्रे, जयमाला ही म्हणत अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुत व गुरु यांची पूजा करून तीर्थकरांस पुष्पमाला अर्पण करावी. नंतर यक्ष व यक्षी आणि ब्रह्मदेव यांचे यथोचित मंत्रानें अर्चन करावे. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अंई वृषभादिवर्धमानांत वर्तमान चतुर्विंशति तीर्थकरेभ्यो यक्षयक्षी सहितेभ्यो नमः स्वाहा ॥ १०८ ॥ या मंत्रानें १०८ पुष्पें घाला- बीत. तीर्थकर चरित्र वाचून ही व्रतकथाहि वाचावी. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. त्यानंतर एका ताटांत दोन पार्ने, दोन अक्षतपुंज, दोन सुपाऱ्या व गंध पुष्पादि घालून महार्घ्य तयार करून कापूर लावून (आरती मात्र तूपाचीच ठेवावी.) मंदिरास तीन प्रदक्षिणा घालाव्यात. आरती करून विसर्जन करावें.
त्यादिवशीं शक्त्यनुसार उपवास करावा. सत्पात्रास आहारदान द्यावें. हा पहिल्या दिवसाचा कार्यक्रमविधि झाला.
या दिवसापासून प्रतिदिनी त्या चोवीस तीर्थकर प्रतिमेस क्षीरानी अभिषेक करून सामुदायिक अष्टद्रव्यांनी अर्चना करावी. एक पुष्पमाला अर्पण करून वरील मंत्राने १०८ पुष्ये घालावीत देवापुढें पानसुपारी ठेवावी. रोज नंदादीप (शक्य तर तूपाचा) ठेवावा. नंतर महार्थ करून ओवाळून विसर्जन करावें.
प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेदिवशी अष्टमीच्या कार्यक्रम विधीप्रमाणे यथाविधी पूजा करावी.
याच कमाने चार महिने पूजा करावी. शेवटी चतुर्विशतितीर्थ- कराराधना करून उद्यापन करावे. शक्ति असल्यास नूतन चोवीस तीर्थकर प्रतिमा करून पंचकल्याणपूर्वक प्रतिष्ठा करावी. चार प्रकारची भक्ष्ये तयार करून त्याचे चार चरु अर्पण करावेत. चार प्रकारच्या धान्यांच्या राशी चार घालाव्यात. चार प्रकारची चार फळें चढवावीत चार वायने तयार करून द्यार्थीत. चतुः संघास यथाशक्ति आहारादि दाने द्यावीत. नंतर आपण पारणा करावी. असा या व्रताचा पूर्णविधि आहे.
कथा
या जंबूद्वीपांतील भरत क्षेत्रांत कांबोज या नांवाचा एक विशाल देश आहे. त्यात उज्जयनी नांवाचे एक मनोहर नगर आहे. तेथे प्राचीनकाळीं मदनपाल या नांत्राचा एक पराक्रमी, गुणवान् व धर्म- निष्ठ असा राजा सुखाने राज्य करीत असे. त्याला मदनावली या नांवाची एक रूपवान्, मनोहर पट्टराणी होती. ही दंपति सुखांन कालक्रमण करीत असतां – एके दिनीं या नगराच्या बहिरुद्यानवनांत मुनिगुप्त या नांवाचे एक दिव्यज्ञानी भट्टारक मुनिराज येऊन उतरले. हे पाहून तेथील वनपालानें एका पात्रांत कांहीं फलपुष्पें घेतीं, आणि तो राजाकडे नगरी जाऊन त्याच्यापुढें तीं ठेवून विन- यानें त्यास म्हणाला- हे राजाधिराज ! आज आपल्या भाग्योदयाने आपल्या या उद्यानांत एक दिव्यज्ञानी महामुनीश्वर आले आहेत. त्यांच्या
आगमनानें सर्ववन नूतन फल, पल्लव, पुष्पांनी अगदी भरीत शाळे आहे. हे शुभवृत्त ऐकतांच त्या राजाला अतिशय आनंद झाला. मग तो राजा त्या वनपालकाचा सन्मान करून किंकराकडून सर्व नगरांत दंवडी देववून सकल परिजन, पुरजन यांच्यासह पादमागीनें त्या मुनीं- द्राकडे गेला. तेथे गेल्यावर त्या मुनीश्वरांस तीन प्रदक्षिणा घालून मोठ्या भक्तीनें नमस्कार करून त्यांच्या सन्निध जाऊन बसला व मुनिमुखें दयाधर्माचा उपदेश ऐकू लागला. कांहीं वेळ धर्मोपदेश श्रवण केल्या- नंतर त्या राजाची धर्मपत्नि जी मदनावळी ती त्या मुनीशास म्हणाली- हे संसारसिंधुतारक महायोगिन् ! आज आपण आम्हांस सुगतिसुखाला कारण व भोगैश्वर्यदायक असे एकादें व्रत द्यावें. ही तिची नम्र भाषा ऐकून ते मुनीश तिला म्हणाले-
हे कन्ये! आतां तुला ‘निरतिशयव्रत ‘ हें पालन करण्यास फार उचित आहे. कारण हे व्रत जे स्त्रीपुरुष भक्तीनें श्रीगुरूंच्या सन्निव ग्रहण करून त्रियोगांनीं पालन करतात त्यांस इहलोकी व पर- ठोकी सर्व भोगैश्वर्य प्राप्त होतात आणि पुढें क्रमाने मोक्षसुखहि मिळते. असे या व्रताचे महत्व आहे. असे म्हणून त्यांनी या व्रताचा विधि सांगितला.
ते सर्व कथन त्या मुनीच्या मुखें ऐकून त्या सर्वांस मोठा आनंद झाला. मग त्या मदनावळीनें त्या प्रहण केलें. नंतर ते सर्व जन त्या आपल्या नगरी परत आले. पुढें यथाविधी पाळू लागलो. मुनीश्वरांस प्रार्थना करून तें व्रत गुरूंस भक्तीनें नमस्कार करून कालानुसार ती मदनावली हे व्रत
त्याचवेळी त्याच नगरांत निर्विशुद्धि या नांवाचा एक वैश्य (श्रेष्ठी) राहत होता. त्याला शीलवती या नांवाची एक सुंदर, भाविक त्री होती. त्या दंपतीस चौतीस ३४ पुत्र झाले होते, त्यामुळे त्यांना अत्यंत दारिद्य आलें होतें. तें इतके की, त्यांना पोटभर अन्न आणि अंगावर भरपूर वबेहि मिळत नव्हती. अशी त्यांची दुःस्थिती
झाली होती. तेव्हां ती शीलवती एकदां सहजगत्या ज्या जिनमंदिरांत ती मदनावली ते व्रत आचरीत (करीत) होती, त्या ठिकाणीं गेली. त्यावेळीं तो व्रतविधी पाहून तिच्या मनांत ते व्रत आपणहि करावें. अशी भावना उत्पन्न झाली. तेव्हां ही शीलवतीहि त्या मदनावली सह हैं व्रत यथाशक्ति पालन करूं लागली. त्या व्रताचा काळ संपूर्ण झाल्यावर अंतीं उभयतांनीं (मदनावली व शीलवतीनीं) या व्रताचें उद्यापन केलें. पुढे थोड्याच दिवसांत त्या व्रताच्या महात्म्यानें त्या शीलवतीच्या गृहीं पुष्कळ धनकनकादिकांची समृद्धि झाली. तेव्हां त्यांनी त्या आपल्या सर्व पुत्रांचीं उग्ने केली. मग ते सर्व जन मोठ्या आनंदांत सुखानें आपले आयुष्य क्रमूं लागले व जिनधर्माचें माहात्म्य प्रशंसूं लागलें आणि दीन, अनाथ जनांस दान करूं लागले. तसेंच नित्य जिनपूजा, शास्त्रस्वाध्यायादि क्रिया करून पुण्य संचय करूं लागले.
याप्रमाणे ते समस्त भोगोपभोगांचा अनुभव घेऊन अंतीं जिन- दीक्षा धारण करून तपश्चरण करून स्वर्ग व क्रमाने अपवर्ग मिळविते झाले. याकरितां भाविक जनांनी कृतकारितानुमोदनांनीं हैं व्रत आचरिले (पाळीले) तरी त्यांना क्रमानें अनंतसुख प्राप्त होते. यांत शंका नाहीं.
यास्तव हे दीनजन हो ! तुम्हीही हे व्रत श्रीगुरूजवळ स्वीका- रून याचे यथाशक्ति भक्तीनें पाळून उद्यापन करा; म्हणजे तुम्हांसही त्यानें अनंतसुख क्रमानें मिळेलच.