व्रतविधि – भाद्रपद शु. ७ दिवशीं प्रातःकाळी या व्रत ग्राहकांनी शुचि जलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वर्षे धारण करावीत.मग सर्व पूमाइन्यें आपल्या हातीं घेऊन जिनालयास जावें. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि वगैरे क्रिया कराव्यात. श्रीजिनेंद्रास साष्टांग नमन करावें. मग श्रीपीठावर नव देवता प्रतिमा स्थापून त्याचा पंचामृतांनी अभिषेक करावा. नंतर अष्ट- द्रव्यांनी त्यांचीं अष्टके, स्तोत्रे, जयमाला हीं म्हणत अर्चना करावी. श्रुत व गुरु यांचें पूजन करून यक्ष, यक्षी, ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें. ॐॐॐहीं श्रीं क्लीं ऐं अई अईत्सिद्धाचार्योपाध्याय सर्वसाधु जिनधर्म जिनागमजिनचैत्यचैत्यालयेभ्यो नमः स्वाहा ॥ १०८ ॥ या मंत्रानें १०८ पुष्पें घालावीत. श्रीजिनसहस्रनामस्तोत्र म्हणून णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. शास्त्रस्वाध्याय करून व्रत- कथा वाचावी. एका पात्रांत नऊ पार्ने लावून त्यावर जलगंधाक्षत पुष्पें, फळे वगैरे ठेवून एक महार्घ्य करून त्यानें ओवाळीत तीन प्रद- क्षिणा घालून मंगलारती करावी. त्या दिवशी उपवास करून धर्म- ध्यानांत काल घालवावा. ब्रम्हचर्य पाळावें. दुसरें दिवशीं सत्पात्रांस आहारादि दानें देऊन आपण पारणा करावी.
त्यानंतर त्याची स्त्री प्रभावती हिनें पद्मावती आर्थिकेजवळ जाऊन दीक्षा घेऊन तेथें रत्नावळी तप केले. (१।२।३।४। ९।५।४।३।२।१।) अशा क्रमानें ३० उपवास व १० पारणा करणे पाला रत्नावली तप म्हणतात. मग ती समाविमरणा नंतर विक्ति ऐनाने अच्युत कल्पांत प्रतीरदास पावली.
ReplyForward Add reaction
|