व्रतविधि – साद्रपद शु. १० दिवशीं या व्रतिकांनीं प्रासुक पाण्यानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वर्षे धारण करावीत. सर्व पूजा साहित्य हातीं घेऊन जिनालयास जावें. तेथे गेल्यावर ईर्यापथशुद्धि वगैरे क्रिया करून जिनेंद्रास साष्टांग प्रणिपात करावा. श्रीपीठावर शीतलनाथ तीर्थकर प्रतिमा ईश्वरयक्ष मानवीयक्षी सहित स्थापून त्यांचा पंचामृतांनी अभिषेक करावा, अष्टद्रव्यांनीं- वृषभा- पासून शीतलनाथापर्यंत १० तीर्थकरांचीं अष्टकें, स्तोत्रे, जयमाला हीं म्हणत -अर्चना करावी. याचप्रमाणें चारवेळां पूर्ववत् अभिषेक आणि पूजा करावी. श्रुत व गुरु यांची पूजा करून यक्ष, यक्षी, ब्रह्मदेव यांचें अर्चन करावें, ॐ हीं श्रीं क्लीं ऐं अई श्रीशीत- लनाथाय ईश्वरयक्षमानवीयक्षीसहिताय नमः स्वाहा ॥ १०८ ॥ या मंत्रानें १०८ वेळां पुष्पें घालावींत. (चाफ्याची फुलें) आणि केतकीचीं (केवड्याचीं) पत्रे (पानें) वाहवींत शीतलनाथ चरित्र वाचून ही व्रतकथाहि वाचावी. श्रीजिनसहस्रनामस्तोत्र म्हणून णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. नंतर एका पात्रांत १० पानें लावून
त्यांवर गंधाक्षता, पुष्पें, फळे वगैरे ठेवून एक महार्ण्य करून त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन मंगळारती करावी, त्या दिवशीं उपवास करून धर्मध्यानांत काळ घालवावा. शाखखाध्यायादि करीत रात्री जागरण करावें. प्रातःकाळीं जिनेश्वरास अनिषेकपूजा करून (सोन्याच्या केवड्यानें) सुवर्ण केतकीनें महार्घ्य करून ओवा- ळावे, घरी गेल्यावर दहा मुनींना आद्वारादि दानें देऊन आपण पारणा करावी.
याप्रमाणे हे व्रत दहा वर्षे करून शेवटी त्याचे उद्यापन करावें, त्यावेळीं श्रीशीतलनाथ तीर्थकर नूतन प्रतिमा यक्ष यक्षी सहित कर- वून तिची पंचकल्याण विधीपूर्वक प्रतिष्ठा करात्री. शीतलनाथ तीर्थकर पुराणाची लिपी करवून सत्पात्रांस शास्त्रदान करावें. सुवर्ण, चांदी यांची फुलें, नारळ, सुगंधीचूर्ण, पान, सुपारी, गंधाक्षता ही एका वेळवाच्या बुट्टींत (करंड्यांत) घालून देवगुरुशास्त्र यांच्यापुढें ठेवून नमस्कार करावा. दहा मुनितांडास ( संघास ) आहारदान देऊन शास्त्रादि आव- श्यक वस्तू द्याव्यात. तसेंच आर्यिकांनाहि द्यावें. पूजकपुरोहितांनाहि आहार देऊन वस्त्रादिकांनी आदर सत्कार करावा. हीन दीन याचक यांनाहि यथाशक्ति दान द्यावें असा या व्रताचा पूर्ण विधि आहे.
कथा –
या जंबूद्विपांतील भरतक्षेत्रामध्यें विजयार्थ नांवाचा एक मोठा पर्वत आहे त्याच्या उत्तर श्रेणीवर शिवमंदिर या नांवाचें एक सुंदर नगर आहे. तेथें पूर्वी प्रियंकर नांवाचा मोठा शूर, न्यायवंत असा राजा राज्य करीत होता. त्याला कमलश्री नामक अत्यंत लावण्यवती व गुणवती पस्त्री होती. त्यांना सागरदत्त नांवाचा एक राजश्रेष्ठी होता. त्याची धनदत्ता नामें सुशील स्त्री होती. त्यांना मनोरमा नांवाची सौंदर्यवती, रूपवती अशी कन्या होती. तिला आपल्या रूप- लावण्याचा अत्यंत अभिमान होता.
एकेदिवती समाभिधुप्ताचार्य नामे दिगंबर महामुनि मासोपवास करून पसरण्यासाठी नगरांत आले होते. तेव्हां मनोरमा ही आपल्या माडीवर तांदूळ लात मार्गनिरीक्षण करीत बसली होती. मुनीचर त्या मादिव जातांना तिच्या दृक्षी पडले, त्यासमयी तिनें जुगुप्सेने मुनीवर अंकीले मन ते अंतराय शाला असे समजून परत बनांत गेले.
त्या सुवीधरावर भुकलेल्या दुष्कृत्याच्या पापामुळे ती मनोरमा आयुष्यांती दुर्भर रोगाने मरण पावून गर्दभी शाली, तेथे नाना प्रका- रची दुःखे भोतून आयुष्यावसानी मरून दुसऱ्या भवांत कुत्री झाली. लरजेच्या रोगाने पीडित होऊन कुजून मरण पावली आणि तिसऱ्या जन्ची ती सूकरी होऊन जन्मली, त्यांतही अनेक रोगांनी मस्त होऊन बिनचैःआलयाच्या मागति पडून प्राण सोडीत असतो एका श्रावकानें तिला पाहून मंत्रोपदेश दिला. त्यामुळे ती सूकरी मरून- इकडे मगध देशांतील वसंततिलकपुरामध्यें विनयसेन राजा राज्य करीत अधून त्याला वसंततिलका नांवाची राणी होती. तिचें उदरों दुर्गंधी नामें कन्या होऊन जन्मली.
पुढे एकेदिवशी सागरसेन नामक एक महाज्ञानी मुनीश्वर वसंततिलकपुर उद्यानांत संघासह येऊन उतरले. ही शुभवार्ता वनपा- लकाने राजास फळविली. तेव्हां तो आपल्या सर्व परिवारजनांसह पाद- मार्गे सुनींच्या दर्शनास गेला. तेथे गेल्यावर विनषानें तीन प्रदक्षिणा घालून त्यांना नमन करता शाला. मग कांहीवेळ धर्मश्रवणानंतर आपले दोन्ही हात जोडून म्हणाला, हे दयासागर मुनिराज ! आमची ही कन्या अयंत दुर्गेधी होऊन जन्मली आहे. याचें कारण काय असावें ? ते आम्हांला सांगावें. हे त्यांचे नम्र वचन ऐकून मुनीश्वर म्हणाले, हे राजन् ! तुझी कन्या येथून मागे पांचव्या भवांत एका ब्राह्मणाच्या घरी मनोरमा नामें पुत्री होती. त्यावेळीं एकदां समाधिगुप्त महामुनींद्राच्या अंगावर तांबूल खाऊन धुंकली. त्या पापामुळे ती मरून अनेक प्रकारचीं
दुःसह दुःखे सहन करीत गर्दभी, कुत्री, सुकरी होऊन जन्मी. शेवटीं मरणकाळी एका श्रावकाकडून कानी मंत्रोपदेश पडल्यामुळे आतां तुमच्या पोटीं ही अशी दुर्गंधी नामें कन्या झाली आहे. पूर्वजन्मींच्या पातकामुळे आतां हिच्या शरीराचा दुर्गंध येत आहे. याप्रमाणें पांच भवांचे सविस्तर कथन ऐकून राजा म्हणाला, हे गुरुराज! या रोगाचा परिहार होण्यासारखा एकादां उपाय सांगावा. हे ऐकून मुनि म्हणाले, हे राजन् ! हिनें आतां सुगंधदशमीव्रत यथाविधी पाळावे म्हणजे त्यायोगें तिच्या दुर्गधाचा नाश होऊन तिला सुगंधी शरीर प्राप्त होईल; आणि पुढे सद्गतिसुखद्दी मिळेल. असे म्हणून त्यांनी त्या व्रताचा सर्व विधी सांगितला. मग खेजा व ती दुर्गंधी यांनी त्या सागरसेन भट्टारक महामुनींच्या चरणी भक्तींनें वंदना करून हें व्रत ग्रहण केले. नंतर ते सर्वजन त्या मुनींना नमस्कार करून परत नगरी आले. पुढे कालानुसार तिनें तें व्रत विधीपूर्वक पाळून त्याचें उद्यापन केलें. त्यायोगानें त्याच भवांत तिचें शरीर अतिसुगंधयुक्त झालें.
मग विनयसेन राजानें तिला रथनुपूर राजाच्या मदनकुमार नामक राजपुत्रांस देऊन थाटानें छग्न केलें. नंतर ती दंपत्ति रथनुपूरांत जाऊन सुखानें जिनभक्ति करीत काल ‘क्रर्मू लागली. पुढें एकेदिवशीं ती सुगंधी राजकन्या आकाशांतून जाणारे स्वर्गीय विमान पाहून त्या विमानाचें ऐश्वर्य मला मिळावें- असे निदान करून मरण पावली. त्या निदानामुळे ती त्या स्वर्गात देवांगना झाली. तिचा पिता विनयसेन हा जिनदीक्षा घेऊन त्या व्रततपप्रभावानें सोळाव्या सर्गात देव झाला. तेथे बावीससागर वर्षे स्वर्गसुख भोगून या लोकांत एक मोठा भाग्यशाली षट् खंडाधिपति चक्रवर्ति झाला. पुष्कळ काळ राज्यैश्वर्य भोगून शेवटीं दिगंबर जिनदीक्षा घेऊन तपश्चर्या करूं लागला. तपानें कर्मनिर्जरा करून शुरुखच्यानाच्या योगाने संपूर्ण कर्माचा क्षय करून मुक्तीस गेडा. तेथे अनंतकाल शिवसुलाचा अनुभव घेऊ लागला.