(८७) नंदीश्वरव्रतकथा.
नंदीश्वरव्रतकथा. व्रतविधि – आषाढ, कार्तिक, फाल्गुन या तीन मासांतील शुक्ल- पक्षांत अष्टमी पासून पौर्णिमेपर्यंत पूजाविधि असत्तो. प्रथम सप्तमी दिवशी या व्रतधारकांनी अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीत वस्ने धारण करा- वींत पूजासाहित्य हातीं घेऊन मंदिरास जावें. जिनालयास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धि वैगैरे क्रिया करून जिनेद्रास भक्तीनें साष्टांग प्रणाम करावा. नंतर जिनेंद्रास क्षीराभिषेक करून अष्टद्रव्यांनीं त्यांची अर्चना करावी….