व्रतविधि– पौष शु. ३ दिवशीं प्रातःकाळीं या व्रतिकांनीं शुचि जळाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वर्षे धारण करावीत. मग सर्व पूजासामग्री हातीं घेऊन जिनालयास जावें. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथ शुद्धि वगैरे कराव्यात. नंतर श्रीजिनेंद्रास भक्तीनें साष्टांग प्राणिपात करावा. नंदादीप लावावा. श्रीपीठावर नवग्रह प्रतिमा व महावीर प्रतिमा यक्ष, यक्षीसह स्थापून त्यांचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. व त्यांचीं अष्टके, स्तोत्रे, जयमाला हीं म्हणत त्याचीं अर्चना करावी. नैवेधे करावीत. श्रुत व गुरु यांचे पूजन करावें. यक्ष, यक्षी व ब्रह्मदेव यांचीं अचर्चा करावी. ॐ हीं अर्हं नव- ग्रहदेवेभ्यो यक्षयक्षीसहितेभ्यो नमः स्वाहा ।। या मंत्राने १०८ वेळां पुष्पें घालावीत. णमोकार मंत्राने १०८ जप करावेंत. श्रीजिन सहस्रनामस्तोत्र म्हणावें. श्रीमहावीरचरित्र वाचावें. व्रतकथाहि वाचावी. एका पात्रांत नऊ पार्ने मांडून त्यांवर अष्टद्रव्यें व एक नारळ ठेऊन महार्घ्य करावें आणि त्यानें ओवाळीत तीन प्रदक्षिणा घालून मंगळारती करावी. त्यादिवशर्शी उपवास करून धर्मध्यानांत काल घालवावा. ब्रह्मचर्य पाळावे. सत्पात्रांस आहारादि दाने द्यावीत. दुसरें दिवशीं पूजा व दान करून पारणे करावें.
Add reaction
|