व्रतविधि – आषाढ मासांतील शुक्लपक्षांत चतुर्दशी दिवशी या व्रतधारकांनीं प्रभातीं शुचिजलांनीं अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत- वर्षे धारण करावीत. सर्व पूजासाहित्य हातीं घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्राम भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. पीठावर पंचपरमेष्ठीची प्रतिमा स्थापून तिला पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुत व गुरु यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें. ॐ हीं अईत्सिद्धाचार्योपाध्यायसर्वसा