व्रतविधि – आषाढ शु. ७ दिवशीं एकमुक्ती करावी. आणि अष्टमी दिवशीं या व्रतिकांनीं प्रातःकाळीं शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्त्रे घ्यावीत. सर्व पूजासाहित्य बरोबर घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदाक्षणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास मक्तीने साष्टांग नमस्कार करावा. पीठावर जिनेश्वर प्रतिभा यक्षयश्क्षीसह स्थापून तिला पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनीं त्याची अर्चना करावी. २४ पोळ्या, दूध, तूप, साखर वगैरे लावून चोवीस चरु करून अर्पावेत. श्रुत व गणधर पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें. मग ॐ व्हीं अहं अर्हत्परमेष्ठिने नमः स्वाहा ।। या मंत्राने १०८ पुष्पें घालावींत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. नंतर एक महाध्ये करून त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्यादिवर्शी ब्रम्हचर्यपूर्वक उपवास करावा. दुसरे दिवशी सत्पात्रांस आहारदान देऊन आपण पारणा करावी. शक्तीप्रमाणे करावें. प्रत्येक अष्टमीस व चतुर्दशीस वरील क्रमानें पूजाक्रम करावा. शेवटीं कार्तिक शु. १५ दिवशीं याचे उद्यापन करावे. त्यावेळीं जिनेंद्रास महाभिषेक पूजा करून देवापुढे सप्त धान्याच्या राशि घालाव्यात. पोळ्या, शर्करा, तूप, दूध वगैरे लावून २४ चरु अर्पावेत. चतुःसंघास चतुर्विध दाने द्यावीत. असा या व्रताचा पूर्णविधि आहे.
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|