व्रतविधि-आषाढ, कार्तिक, फाल्गुन या महिन्यांत येणाऱ्या नंदीश्वर पर्वांत शु. चतुर्दशीं प्रातःकाळीं या व्रतकांनीं उष्णजलांनीं अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौतवस्खें धारण करात्रींत. सर्वपूजा साहित्य हातीं घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईयापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास मक्तीने साष्टांग प्रणिपात करावा. पीठ वर चोवीस तीर्थंकर प्रतिमा यक्षयक्षीसह स्थापून तिला पंचामृताभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. चरु करावेत. श्रुत व गण- धर यांची पूजा करून यक्ष, यक्षी, व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे. ॐ हीं श्रीं क्लीं ऐं अहे वृषभादिचतुर्विंशतितीर्थकरेभ्यो यक्ष- यक्षीसहितेभ्यो नमः स्वाहा ।। या मंत्राने १०८ पुष्पें घालावींत. ही व्रतकथा वाचावी. शेवटीं एक महाध्य करून त्यानें ओवाळीत मंदि रास तीन प्रदक्षिणा घालून मंगळारती करावी. ब्रम्हचयपूर्वक त्य दिवशीं उपवासादिक करावे. सत्पात्रास आहारदान द्यावें. याचक्रमाने चार महिने हैं व्रत करून (प्रतिदिनीं पूजाक्रम करावा. अष्टमी व चतुर्दशीस उपवास करावा. इतर वेळीं भोजन करावे.) पुढे येणाऱ्या नंदीश्वर अष्टान्हिकपर्यंत याचे उद्यापन करावें. त्यावेळीं चोवीस तीर्थकरांस महाभिषेकपूजा करावी. २४ प्रकारचे चरु, २४ प्रकारचीं फुलै २४ प्रकारची फळे अर्थावीत. चतुःसंघांस चतुर्विध दाने द्यावीत. असा या व्रताचा पूर्णविधि आहे. है जन जे सद्गुरुबवळ घेऊन विधिपूर्वक पालन करतात; स्यांना उत्कृष्ट पुण्यबंध होतो. आणि इइपरलोकी सुले मिळत. अंतीं या संसारसमुद्रांतून पार होतात.
ReplyForward Add reaction
|