या जंबूद्वीपांतील भरतक्षेत्रांत कांभोज नांवाचा एक विशाल देश आहे. त्यामध्ये भूतिलक नामक एक मनोहर पट्टण आहे. तेथे पूर्वी देवपाल नांवाचा धार्मिक राजा राज्य करीत होता. त्याला लक्ष्मीमती नांवाचो एक सुंदर धर्मपत्नि राणो होती. ते उभयता मोठ्या आनंदाने कालक्रमण करीत होते. त्यांचा राजश्रेष्ठी धनदत्त नांवाचा होता. त्याला धनश्री नाम्नी गुणवती स्त्रो होती. त्यांनी एके दिवशीं नित्यनियमाप्रमाणे जिनमंदिरास जाऊन अष्टविधार्चन पूजा केली. तेव्हां तेथे ज्ञानसागर नामक निर्भथ मट्टारक महामुनिराज आहे होते. त्यांना नमोस्तु करून त्याच्याजवळ जाऊन बसून कांहीं धर्मोपदेश देकला त्यानंतर त्यांनीं गुरुरायांना प्रार्थना करून असा प्रश्न केला कीं; भो संसारसागरतारक स्वामिन् ! आपण आम्हांस परम सुखाला कारणीभूत असे एकादें व्रतविधान सांगावे. ही त्यांचीं नम्र पार्थना ऐकून ते मुनी- श्वर म्हणाले, तुम्ही सर्वसुखाला कारण असे है सप्तपरमस्थानव्रत यथाविधि करा, म्हणजे तुम्हांस परमसुख प्राप्त होईल, असे म्हणून त्यांनीं त्यांना सर्वविधि सांगितला. मग सर्वांर्वांना संतोष झाला. तेव्हां हे व्रत पूर्वी कोणी पाळलें आहे त्यांचे चरित्र कथन करावे? असा प्रश्न ऐकून त्यांनी त्यांना पुढील प्रमाणे कथा सांगितली.
ReplyForward Add reaction
|