व्रतविधि – भाद्रपद शु. १४ दिवशीं प्रभार्ती या व्रतिकांनीं सुखोष्ण जलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौतवर्षे धारण करा- बींत. सर्व पूजासामग्री हातीं घेऊन जिनालयीं जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक श्रीजिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नम- स्कार करावा. पीठावर चोवीस तीर्थकर प्रतिमा यक्षबक्षीसह स्थापून तिचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनीं त्यांचो अर्चना करावी. श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष, यक्षी आणि ब्रम्हदेव यांचे यथोचित मंत्रानें अर्चन करावे, ॐ नहीं अर्ह वृषभादिचतुविशार्तवीबैंकरेभ्यो यक्षबक्षीसहितेभ्यो नमः स्वाहा ।। या मंत्रार्ने १०८ पुणे घालावीत.’ णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. एका पात्रांत सोळा पार्ने क्रमाने लावून त्यांवर अष्टद्रव्येसहित १६ गव्हाच्या पुग्यावर तूप साखर घालून ठेवावे. मध्ये एक नारळ मांडून महार्घ्य करून स्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मेगलारती करावी, त्यादिवशीं ब्रह्मचर्यपूर्वक उपवास करावा. दुसरे दिवशीं जिनपूजा करून नैवेद्य दाखवून सत्पात्रांस आहारदान देऊन आपण पारणें कर्रावं.
ReplyForward Add reaction
|