व्रतविधि – माद्रपद शु. ५ दिवशीं या व्रत ग्राहकांनीं प्रातःकाळीं सुखोष्ण जलांनी अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीत वर्षे घ्यावीत. सर्व पूजा सामग्री हातीं घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन पद- क्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीने साष्टांग नमस्कार करावा. मंडप शृंगार करून शुद्धनूतनवस्त्रावर यंत्रदल काढून वर चंद्रो पक बांधावे, खालीं शुद्धभूमीवर पंचवर्णानीं दशलक्षणदल यंत्र काढून त्याच्या सभोंवती चतुष्कोणी पंचमंडले काढावींत. मध्यभागीं श्वेतसूत्रवे- ष्ठित सुशोभित कुंभ ठेवून आठ दिशेस अष्टमंगलकलश आठ मंगलद्रव्यें ठेवावीत. त्यांन पंचवर्णसूत्र व वस्त्र गुढाळावे. नंतर पीठावर दशलक्षण- यंत्र व चोवीसतीर्थकर प्रतिमा यक्षबक्षीसह स्थापून त्यांचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. एका ताटांत दहा पार्ने, गंध, अक्षता, फुले वगैरे लावून तो ताट मध्यकुंभावर ठेवून त्यावर तें यंत्र व मूर्ति स्थापावी. भगवन नित्यपूजाक्रम करून दशलक्षणिकमतपूजाविधान वाचावे. विधानांत सांगितल्याप्रमाणे सर्व किया केल्यानंतर ही व्रतकथा वाचावी. एक पात्रांत दहा पार्ने लावून त्यांवर अष्टद्रव्ये लावून एक महाये करून त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती ‘करावी. उपवासादिक यथाशक्ति ब्रम्हचर्यपूर्वक करून धर्मध्यानांत काल घालत्रावा. याच क्रमाने दडा १० दिवस हा पूजाक्रम करावा. असे १० दहा वर्षे हैं व्रत करून नंतर याचे उद्यापन करावे. त्यावेळी दशकाक्षणिक- व्रतोद्यापनविधान करावें. नूतन चोवीस तीर्थकर प्रतिमा, श्रुतस्कंध आणि गणधर पादुका तयार करवून त्यांची पंचकल्याणत्रिधिपूर्वक प्रतिष्ठा करावी. नूनन जिनमंदिर बांधावे. जीर्ण जिनचैत्यचैत्यालयाचा उद्धार करावा. मंदिरांत आवश्यक उपकरणे व भांडी ठेवावीत. चतुः संघास चतुश्धिदानें देऊन त्यांना शाखें, श्रुतवस्त्रे जपमाळा, कमंडलु पिंछी वगैरे वस्तूं द्याव्यात. दहा दंपतीस आपल्या घरीं भोजन करवून वस्त्रा- दिकानीं त्यांचा सन्मान करावा. दहा वायर्ने बांधून देवशास्त्रागुरु यांच्यापुढे एकेक ठेवून नमस्कार करावा. मग गृहस्थाचायाँस व दंपतीस बावीत असा या व्रताचा पूर्णविधि आहे.
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|