व्रतविधिः – आश्विन शु. ७ दिवशीं या ब्रतिकांनीं एकमुक्ति करावी आणि ८ दिवशीं प्रातःकाळों शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्ने धारण करावींत. सर्वपूजासाहित्य बरोबर घेऊन जिनालयास जावे. चैत्यालयांस तीन प्रदक्षिणा घालून ईयर्यापथशुद्धि- पूर्वक जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. पीठावर सुनिसुव्रत तोर्थकर प्रतिमा वरुणयक्ष बहुरूपिणी यक्षीसह स्थापून तिला पंचामृता- भिषेक करावा. शृंगारलेल्या मंडपांत देवापुढे शुद्धमूमीवर पंचवर्णानीं अष्टदलयंत्र पंचमंडलासह काढून मध्यभागीं सुशोभित कुंभ ठेवावा. दळा- मोंवतीं अष्टमंगलद्रव्ये व फलश ठेवावेत. एका ताटांत आठ पार्ने अक्षता, फुले, फले वगैरे लावून तो ताट मध्यकुंभावर ठेवावा. नित्यपूजाक्रम करून जीवदयाष्टमीव्रतपूजाविधान वाचावे. त्याममाणें सर्व अर्चना करावी. ॐ हीं अई श्रीं क्लीं ऐं अई मुनिसुव्रततीर्थकराय वरु- णयक्षबहुरूपिणीयक्षीसहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ सुगंधी पुष्पें घालावीत. याच क्रमाने चार प्रहरी (नारक झांव) पूजा विधान करावे. मग श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रह्मदेव यांचे अर्चन करावें. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा.
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|