व्रतविधि – फाल्गुन शु. १ दिवशीं प्रातःकाळीं या नतिकांनी शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्ने धारण करावीत. नंतर सर्व पूजासामग्रओ आपल्या हातीं घेऊन जिनालयास जावें. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा घेऊन ईर्यापथशुद्धि वगैरे क्रियांपूर्वक श्रीजिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. मग श्रीपीठावर श्रीपंचपरमेष्ठी प्रतिमा स्थापून त्यांचा पंचामृतांनी अभिषेक करावा. देवापुढे एका पाटावर पांच स्वस्तिके काढून त्यांवर पांच पार्ने लावून त्यांच्यावर अष्टद्रव्ये मांडात्रींत. मग पंचपरमेष्ठीचीं अष्टके, स्तोत्रे, जयमाला हीं म्हणत त्यांचो अर्चना करावी. पंच पका- नांचे चरु करावेत. पांच सुगंधी पुष्पमाळा देवांस वाहाव्यात. श्रुत व गुरु यांची पूजा करावी. यक्ष, यशी व ब्रम्हदेव यांचे पूजन करावें. ॐ न्हीं अहे अर्हत्सिद्धाचार्योपाध्यायसर्वसाधुभ्यो नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुष्पें घालावीत. णमोकार मंत्राचा जप १०८ वेळां करावा. श्रीजिनसहस्रनामस्तोत्र म्हणून श्रीपंचपरमेष्ठी गुणवर्णनपूर्वक शास्त्रास्त्राध्याय करावा. ही व्रतकथाही वाचावी. एका पात्रांत पांच पार्ने मांडून त्यांवर अष्टद्रव्यें व एक नारळ ठेवून महार्घ्य करावें. आणि त्यानें ओवाळोत तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्या दिवशीं उपवास करून धर्मध्यानांत काल घालवावा. सत्पात्रांस आहारादि दाने देऊन पांच सुवासिनी स्त्रियांस भोजन करवून त्यांच्या ओट्यांत नारळ, पान, सुपारी, गंधाक्षता बगैरे घालून त्यांचा सन्मान करावा. या क्रमाने हैं व्रतपूजन महिन्यांतून एकदां त्याच तिथीस करावे. या प्रमाणे बारा पूजा पूर्ण झाल्यावर शेवटी या व्रताचे उद्यापन करावे. त्यावेळीं श्रीपंचपरमेष्ठीविधान करून महाभिषेक करावा. पांच मुनि समूहास आहारादि दानें देऊन आर्थिकांनाहि द्यावींत, श्रवकश्राविकांना अन्न व वस्त्रदान करावें. असा या व्रताचा पूर्णविधि आहे.
है व्रत जे भन्य जीव विधिपूर्वक पाळून त्याचे उद्यापन करितात त्यांना उत्कृष्ट पुण्यचंच होतो, आणि त्या योगाने त्यांना सर्व सांसारिक सुले प्राप्त होऊन शेवटी फनानें अक्षयसुख संपतिही अवश्य मिळते असा या व्रताचा महिमा आहे.
– कथा-
श्रेणिक राजा व चेलना राणी यांचीच कथा आहे. ती प्रथमतः दिली आहे. त्यावरून येथे तशी समजावी.