व्रतविधि – आषाढ, कार्तिक, फाल्गुन या मासांतील कोणत्याहि नंदीश्वर पर्वांत अष्टमी दिवशीं या व्रतिकांनीं शुचिजलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौतवस्ने धारण करावीत. सर्व पूजाद्रर्षे आपल्या हातीं घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथ शुद्धिपूर्वक जिनेंद्रास मक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. पीठावर जिन- प्रतिमा यक्षबक्षीसइ स्थापून तिला पंचामृतांनीं अभिषेक करावा. देवापुढे शुद्धभूमीवर गणधरवलयाचे यंत्रदल विधानांत सांगितल्या प्रमाणे पंचवर्णांनी काढून गणधरवलय यंत्र असल्यास यंत्र स्थापावे. नसल्यास एका ताटांत गंधाने यंत्र काढून ते गंधाने अभिमंत्रित करून त्यावर तीर्थकर प्रतिमा बसवावी, मंडपश्रृंगार वगैरे करावें. नित्यपूजाक्रम करून गणधरवलयविधान वाचून यथानुक्रम अर्चना करावी, मंत्रजाप्य विधानांत सांगितल्या प्रमाणे घालावे. अंतीं एक महार्घ्य करून त्याने ओवाळोत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. याप्रमाणे अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत आठ दिवस हा पूजाक्रम करावा. अर्थात् गणधरवळ्याची आराधना करावी. चतुःसंघास चारप्रकारचीं दानें द्यार्वीत. है व्रत ४८ वर्षे केल्यास उत्कृष्ट नियम म्हणतात. २४ वर्षे किवा १२ वर्षे अगर ६ वर्षे अथवा ३ वर्षेहि करण्याचा नियम करतात. यांतील कोणताहि नियम पूर्ण झाल्यावर या व्रताचे उद्यापन करावे, त्यावेळीं यथाशक्ति नूतन चैत्यालय बांधून जिनबिण तयार कर- वून त्यांची प्रतिष्ठा करावी. नित्य नैमित्तिक पूजाभिषेक चालण्यासारखी व्यवस्था करावी, असा याचा पूर्णविधि आहे.
– कथा –
या जंबूद्वोपांतील भरत क्षेत्रांत मंगलावती नांवाचा देश असून त्यांत रत्नसंचय नांवाचे एक सुंदर नगर आहे. तेथे पूर्वी सोमवाहन नामक पराक्रमी, गुणवान्, नीतिमान् असा राजा राज्य करीत होता. त्याला विनयावती नांवाची रूपवती, गुणवती अशी पट्टराणी होती. त्यांना चंद्राभ नांवाचा पुत्र असून त्याला चंद्रमुखी नांवाची प्रियपत्नि होतो. यांच्यासह तो राजा राज्योपभोग करीत असतां, – एकदां प्रभातकालीं वनपालकानें एक सुंदर कमलपुष्प राजाला आणून दिले. वै निरीक्षण करीत पाहात असतां त्यांत एक भ्रमर मेलेला दिसला. तेव्हां तत्काल त्याच्या अंतःकरणांत वैराग्य उत्पन्न झाले. त्यामुळे त्यानें आपले सर्वराज्य आपल्या पुत्राच्या स्वाधीन केले, आणि वनांत जाऊन एका दिगंबर गुरुजवळ जिनदीक्षा घेतली. तो पुष्कळ दिवस घोरतपश्चर्या करून सर्वकर्मे नाशून मोक्षाप्त गेला.
इकडे त्याचा पुत्र चंद्राभ हा यौवनानें मदोन्मत्त होऊन दुर्जन लोकांच्या संगतीनें सप्तव्यसनामध्ये आसक्त झाला. मग एके दिवशीं हा शिकार करण्यासाठीं कांहीं दुष्ट लोकांसह एका वनांत गेला होता. तेव्हां तेथे अभयघोष या नांवाच एक महामान त्यांच्या दृष्टीस पडले. आतां है मुनि आपल्या या शिकारकार्यात विघ्न उत्पन्न करतील असे समजून त्याने त्या मुनीश्वरांस तिरस्कारून तेथून बलात्काराने हाकलून लाविले. त्या पापाच्या फलानें कलिंग देशाच्या कालयवन नामक प्रबल राजानें आपल्या सैन्यांनिशीं येऊन त्या रत्नसंचयपुरावर छापा घातला. चंद्राभ आणि चंद्रमुखी यांना तेथून हाकलून लाविले, तेव्हां ते दोघे तेथून पळून जाऊन मलयाचल पर्वताच्या एका गुहेत लपून बसले. तेथे युगंधर नामे महामुनी बसले होते. त्यासमयीं त्यांना पाइतांच या दोघाच्या मनांत उपशांत भाव उत्पन्न झाला. मग ते दोघे त्यांच्या समीप ‘जाऊन मोठ्या भक्तीनें त्यांना नमस्कार करून बसले. नंतर तो चंद्राभ राजा अत्यंत विनयाने आपले करयुगल जोडून मुनींद्रांस म्हणाला, हे महास्वामिन् ! आज आमचे राज्य जे गेले ते कोणत्या कारणानें गेलें ? हे त्याचे नम्रभाषण ऐकून ते आपल्या अवधिज्ञानाने त्याची सर्व परिस्थिति जाणून त्याला म्हणाले; – हे भव्यपुरुषोत्तम राजेंद्रा ! तूं एका वेळीं अभयघोष नामक महामुनींचा तिरस्कार करून त्यांना त्या वनांतून हाकलून लाविलेस, त्या पापांमुळेच सांगत तुला ही दुःखस्थिति प्राप्त झाली आहे. हे त्या मुनीश्वरांचे उद्गार ऐकतांच त्याच्या मनांत अतिशय पश्चात्ताप झाला. तो स्वतः आपली निंदा करून घेऊन त्या मुनींस म्हणाला, – भो जगद्गुरो ! आतां आपण आम्हांस त्या महापापांचा परिहार होण्यासारखा एकादा उत्कृष्ट उपाय सांगावा. है त्याचे नम्रभाषण ऐकून ते मुनी त्यास म्हणाले, हे राजन् ! गणधरवलय व्रत है भक्तोनें यथाविधि पालन करा, असे म्हणून त्यांनीं त्याचा सर्व विषि सांगितला. ते ऐकून त्या दोघास अत्यंत आनंद झाला. मग त्यांनीं है व्रत त्या मुनीश्वरांसमीप ग्रहण केलें. नंतर तो चंद्राभ व चंद्रमुखी हे दोघे त्या मुनिवरांत नमस्कार करून आपल्या श्वशुरगृहीं परत आले. तेथे आल्यानंतर समयानुसार है व्रत पाळू लागले.
या अवधींत मलयाचल देशाचा राजा स्वर्गस्थ झाला. अर्थात् अकस्मात् मृत्यु पावला. त्याच्या पोटीं पुत्रसंतान नव्हते. त्याकारणाने त्या राज्यासंबंधीं विचार करण्यासाठीं अष्टप्रधान मंडळी एकत्र जमली. मग त्यांनीं असा निश्चय केला कीं; आतां आपल्या या राजवाड्यांतील एक हत्ती श्रृंगारून त्याच्या सोंडेंत एक कलश व पुष्पमाला देऊन सोडावा. तो ज्या सत्पुरुषाच्या गळ्यांत ती घाळील, त्याला या राज्यावर बसवावे. मग त्याप्रमाणे त्यांनी एक हस्ती श्रृंगारून देशांतरीं सोडून दिला. तेव्हां तो इत्ती भ्रमण करीत करीत तो चंद्राभ ज्या स्थळीं होता तेथे गेला. त्याने चंद्राभाला कलशांतील पाण्याने अभिषेक करून कंठांत पुष्पमाला घातली. नंतर आपल्या मस्तकावर बसवून ‘घेऊन सरळ त्या राजप्रसादी परत आला. हे पाहतांच सर्व जनांस मोठा आनंद वाटला. मग त्या सर्व लोकांनी मिळून त्याला राज्याभिषेक करून राजप- ट्टावर बसविले. मग तो तेथे कांहीं फाल आपल्या पत्नीसह सुखाने राज्योपभोग घेऊं लागला.
पुढे कित्येक दिवसांनीं तो अनेक सैन्यांसह त्या आपल्या रत्नसं- चयपुरीं आला. तेथोल आपला पूर्वशत्रु जो कालयवन राजा त्याचा पूर्णरीतीने पराभव करून त्यांनी त्याला तेथून पळवून लाविलें. मग तो पुनः आपल्या राज्यांवर अधिष्ठित होऊन सुखाने राज्योपभोग करूं लागला. नंतर त्याने हे गणधरवलय व्रत यथाविधि पाळिलें. पुढें तो आयुष्यांतीं मृत्यु पावून लांवव कल्पांत देव झाला आणि तेथे पुष्कळ काळ सुलाचा अनुभव घेऊ लागला.
इकडे या जंबूद्वीपांत अपरविदेह नांवाचे एक विस्तीर्ण क्षेत्र आहे. तेथे सीता नदीच्या दक्षिणतटावर पद्म या नांवाचा एक देश आहे. त्यांत सिंहपुर नांवाचे एक सुंदर नगर आहे. तेथे पुरुषदत्त नांवाचा राजा असून त्याला विमलमती नांवाची एक राणो होती. तिच्या पोटीं तो पूर्वोक्त लांतव स्वर्गातील देव आपल्या आयुष्या- वप्तानीं तेथून च्यवून अपराजित नामे पुत्र होऊन जन्मला. कांहीं दिवसानीं त्या पुरुषदत्त रायाच्या मनीं या संसाराविषर्थी वैराग्य उत्पन्न झाले. तेव्हां त्यानें आपल्या अपराजित राजपुत्रांस राज्यभार देऊन वनांव जाऊन श्रीगुरुजवळ जिनदीक्षा घेतली. तो पुष्कळ दिवस घोर तपश्चर्या करून तपोबलाने सर्वकर्माचा क्षय करून मोक्षास गेला. इकडे अपराजित राजा महामंडलेश्वर पदवी धारण करूनपुष्कळ सुखाचा अनुभव घेऊ लागला. एकदों, तो विमलवाइन नामक सर्वज्ञ केवलीच्या दर्शनास गेला होता. मग त्यांच्या चरणी जिम- दक्षिणापूर्वक वंदनादि करून त्यांच्या समीय धर्मोपदेश ऐकत बसका. त्यासमयीं त्याच्या अंतःकरणांत सहसा वैराग्य उत्पन झाले, त्यामुळे त्याने त्यांच्या चरणी प्रार्थना करून जिनदीक्षा धारण केलो माणि पुढे पूर्वक्कृत अतपुण्याने व तपोबलाने गणधरपट्टी निळवून सर्व कर्माचा क्षय करून भलंड मोक्षमुख प्राप्त करून घेतले. असा या ब्रताचा महिमा आहे.