व्रतविधि – आषाढ शु. ५ दिवशीं या ब्रतिकांनीं शुचिजलाने अम्यंगस्नान करून अंगावर दृढधीतवले धारण करावीत. सर्व पूजा द्रव्यै हातीं घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथ- शुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीने साष्टांग नमस्कार करावा. पीठावर पंचपरमेष्ठी प्रतिमा स्थापून तिचा पंचामृतांनी अभिषेक कराश. अष्ट- द्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे.