व्रतविधि-कार्तिक आष्टान्हिकांत शु. ८ ते १५ पर्यंत आठ दिवस प्रतिदिवशीं या व्रत ग्राहकांनीं प्रातःकाळीं शुचिजलाने अभ्यंग- स्नान करून अंगावर दृढधीतवस्खें धारण करावीत. सर्व पूजासाहित्य बरोबर घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धि वगैरे क्रिया कराव्यात. श्रीजिनेंद्रास मक्तीने साष्टांग नमस्कार करावा. देवापुढे नंदादीप लावावा. पीठावर नंदीश्वर बिब, नवदेवता, चोवीसतीर्थकर प्रतिमा स्थापून त्यांचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. पंचमंदरावर सर्व प्रतिमा ठेवून प्रथम चोवीस तीर्थंकर आणि नवदेवता समुदाय पूजा करून नंतर पूर्व, दक्षिण, पश्चिम व उत्तर या क्रमाने नंदीश्वर बिंबांची समुदाय पूजा करावी. मग पंचमेरुपूजा करावी. सर्व चरु करावेत. श्रुत व गणधर यांची अर्चा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें, ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं अर्हत्सिद्धाचार्योयाध्यायसर्वसाधुजिनधर्मजिनागमजिनचैत्यजिनचैत्यालयेभ्योनमः स्वाहा ॥ या मंत्र.ने १०८ पुष्पे घालावींत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. श्रीजिनसहस्रनामस्तोत्र म्हणून नंदीश्वर भक्ति म्हणावी. मग एका पात्रांत नऊ पार्ने लावून त्यांवर अष्ट द्रच्ये आणि एक नारळ ठेवून महार्घ्य कराने त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. शांति- भक्ति पूर्ण म्हणून विसर्जन करावे. सलात्रांस आहारादि दाने द्यावीत. यथाशक्ति उनवासादिक करावा. ब्रम्हचर्य पाळावे.
या प्रमाणें आठ दिवस पूजाक्रम केल्यावर कार्तिक कृ. १ दिवशीं विसर्जन करावें. आठ दिवस बारा व्रते पाळावीत. असा याचा पूर्णविधि आहे.
– कथा –
है बउ पूर्वी दशरथ राजानें यथाविधि पाळल्यानें त्याला राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, असे चार पुत्र झाले. ते संसारांतील सकल साम्राज्य सुखे भोगून शेवटीं जिनदीक्षा घेऊन समाधि पूर्वक मरण पावून स्वर्गास गेळे, पुढे