व्रतविधि – आश्विन मासांत पहिल्या रविवारी या व्रतिकांनीं प्रातःकाळीं शुचिजलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौतवले धारण करावीत. सर्व पूजा द्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जावे. मंदिशस तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीने साष्टांग नमस्कार करावा. पीठावर चंद्रप्रभ तीर्थकर प्रतिमा श्यामयक्ष व ज्वालामालिनी बक्षीसह स्थापून तिला पंचामृतांनी अभिषेक करावा. मग त्यांची अष्टद्रव्यांनी अर्चना करावी. श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष, यक्षी व बम्ददेव यांचे अर्चन करावे ॐॐॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं चंद्रपम तीर्थकराय श्यामयक्ष ज्वाला- मालिनी यक्षीसहिताय नमः स्वाहा ।। या मंत्राने १०८ पुष्पें बाला- बींत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. नंतर एक महार्घ्य करून त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. यथाशक्ति उपवासादि करावे. ब्रम्हचर्य पाळावे. दुसर दिवशी पूजा व दान करून पारणे करावें.