मग विनयसेन राजानें तिला रथनुपूर राजाच्या मदनकुमार नामक राजपुत्रांस देऊन थाटानें छग्न केलें. नंतर ती दंपत्ति रथनुपूरांत जाऊन सुखानें जिनभक्ति करीत काल ‘क्रर्मू लागली. पुढें एकेदिवशीं ती सुगंधी राजकन्या आकाशांतून जाणारे स्वर्गीय विमान पाहून त्या विमानाचें ऐश्वर्य मला मिळावें- असे निदान करून मरण पावली. त्या निदानामुळे ती त्या स्वर्गात देवांगना झाली. तिचा पिता विनयसेन हा जिनदीक्षा घेऊन त्या व्रततपप्रभावानें सोळाव्या सर्गात देव झाला. तेथे बावीससागर वर्षे स्वर्गसुख भोगून या लोकांत एक मोठा भाग्यशाली षट् खंडाधिपति चक्रवर्ति झाला. पुष्कळ काळ राज्यैश्वर्य भोगून शेवटीं दिगंबर जिनदीक्षा घेऊन तपश्चर्या करूं लागला. तपानें कर्मनिर्जरा करून शुरुखच्यानाच्या योगाने संपूर्ण कर्माचा क्षय करून मुक्तीस गेडा. तेथे अनंतकाल शिवसुलाचा अनुभव घेऊ लागला.
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|