व्रतविधि – श्रावण मासाच्या शुक्लपक्षांतील पहिल्या शुक्रवारी प्रातःकाळों प्रायुक पाण्यानें तैलाभ्यंगस्नान करून नूतनधौत व पवित्र बस्ने अंगावर धारण करावींत. सर्व पूजासामग्री बरोबर घेऊन जिना- ळ्यास जाने मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक जिर्ने- द्रास मक्तीने साष्टांग नमस्कार करावा. पोठावर चोवीस तीर्थकर प्रतिमा यक्षयक्षीसह स्थापून तिचा पंचामृतांनी अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनीं त्यांचो अर्चना करून श्रुत व गणधर यांची पूजा करावी. यक्ष, यक्षी व ब्रह्मदेव यांचे अर्चन करावे, ॐ ह्रीं श्रीं क्लीं वृषभादिवर्धमानांत्यचतुविशतितीर्थकरेभ्यो यक्षयक्षी- सहितेभ्यो नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुष्र्षे घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी, सात प्रकारचा भक्ष्याचे सात चरु करावेत. मग एक महार्घ्य करून त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. ब्रह्मचर्यपूर्वक उपवास करून धर्मध्यानांत दिवस घालवावा. दुसरे दिवशीं पूजा, दान करून आपण पारणे करावें.
याच क्रमाने पांच शुक्रवारी पूजाक्रम करून शेवटीं उद्यापन करावे. त्यावेळीं चतुत्रिंशतितीर्थकराराधना करून महाभिषेक करावा. सात मुनिसंघास आहारादि दाने द्यावीत. असा याचा पूर्णविवि आहे. है व्रत जे पाळतील त्यांना आत्महितकारक सुखें प्राप्त होतील.
कथा – श्रेणिक महाराजे व चलना महाराणी यांची कथा येथे वाचावी.