व्रतविधि – फाल्गुन शु. ७ दिवशीं या व्रतिकांनी एक्मुक्ति करावी. आणि ८ दिवशीं प्रातःकाळीं सुखोष्ण जलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौतवस्त्रे धारण करावोत, सर्व पूजासामग्री हातीं घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून इर्यपवशु- द्धिपूर्वक जिनेंद्रास मक्तीने साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. पीठावर नंदीश्वर बिंब आणि चोवीस तीर्थकर प्रतिमा यक्षयक्षीसहित स्थापून त्यांचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. मग त्या प्रतिमा पंचमंद- रावर स्थापून आणि देवापुढे एका पाटावर आठ स्वस्तिकें काढून त्यांत्रर आठ पार्ने, फुले, फळे वगैरे मांडून अष्टद्रव्यांनीं त्यांचो अष्टकें, स्तोत्रे, जयमाला हीं म्हणत अर्चा करावी. श्रुत व गणधर पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें. पंचपकान्नांचे पायसासह चरु करा- वेत. ॐ ह्रीं अर्हं असिआउसा सर्वजिनबिंवेभ्यो नमः स्वाहा ॥ या मंत्राने सुगंधी १०८ फुले घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप कराया. ही व्रतकथा वाचावी. नंतर एका पात्रांत महाध्य करून त्याने ओवाळींत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्यादिवशी उपवास करावा. अथवा आठ वस्तूंनी एकाशन करावें. सत्पात्रांत आहारदान द्यावे. दुसरे दिवशीं पूजा, दान करून आपण पारणा करावी.
यापमाणे पौर्णिमेपर्यंत पूजाक्रम करून पौर्णिमेदिवशीं रथ अथवा शिबिका महोत्सव करून महाभिषेक करावा. फाल्गुन कृ. १ दिनीं जिनपूजा व आठ मुनीश्वरांना, आर्यिकांना, ब्रम्हचारी, पुरोहित, कथक, आवक, श्राविका यांना भोजन करवून नूनन वस्त्रादिकांनीं त्यांचा सन्मान करावा. असा याचा पूर्णविधि आहे. हे व्रत जे मात्रिक जन गुरुजवळ घऊन याचे यथाविवि पालन करतात, त्यांना उत्तम तीर्थकर कर्मप्रकृतीचा बंध होऊन अष्ट महाप्रातिहायाचे ऐश्वर्य भोगून शेवटीं सर्व कर्माचा नाश करून मोक्षाची प्राप्तो होते. असे बाचे महत्व आहे.
कथा – श्रेणिक राजा आणि चलनाराणी यांचीच कथा येथे घ्यावी.