व्रतविधि-आषाढ, कार्तिक, फाल्गुन, या मासांतील कोणत्या- हि नंदीश्वर पर्वांत शु. ७ दिवशीं प्रातःकाळीं शुचिजलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वने धारण करावीत. मग सर्व पूजा साहित्य बरोबर घेऊन जिनालयास जात्रे, मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापणशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीने साष्टांग नमस्कार करावा, पीठावर पंचपरमेष्ठी व नवदेवता प्रतिभा स्थापून त्यांना पंचामृतांनी अभिषेक करावा, नष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष, यझी व मदेव यांचे अर्चन करावे. ॐ नहीं श्रीं क्लीं ऐं अई अर्हत्सिद्धाचायोपाध्यायसर्वसाधुभ्यो नमः स्वाहा ।। या मंत्राने सुगंधी १०८ पुधे घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. मग एका पात्रांत महाये करून त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्यादिवशी उपवास करून ब्रह्मचर्यपूर्वक धर्मध्यानपूर्वक काळ घालवावा. दुसरे दिवशी पूजा, दान, करून आपण पारणे करावे. (उपवास करण्याची शक्ति नसल्यास ७ ते ९ तीन दिवस पाव वस्तूंनी एकाशन करावे.)
बापमाणे चार महिन्यांत शुक्लपक्षांत ज्या अष्टमी व चतुर्दशी येतील त्यादिवशीं पूजाक्रम क्रून पुढील आष्टान्हिकांत या व्रताचे उद्या- पन करावे. त्यावेळी नूतन पंचपरमेष्ठो प्रतिमा तयार करून विची पंच- कल्याणपूर्वक प्रतिष्ठा करावी. अथवा पंचपरमेष्ठोविधान करून महाभिषेक करावा. चनुःसंघास चतुर्विधदाने द्यावीत. असा याचा पूर्णविधि आहे. हे व्रत जे पालन करतील ते अनेक भोग्यैश्वर्यास प्राप्त होतील आणि शेवटी मोशास जातील.
– कथा –
हे व्रत पूर्वी सुदर्शन श्रेष्ठी, जिनदत्त श्रेष्ठी, वगैरे भनिक आणि अन्य दीन भाविक जनांनीं विधिपूर्वक यथाशक्ति भक्तीनें पालन करून स्वर्गादि सुख व अपवर्ग-मोक्ष-सुख मिळविले आहे. असे दृष्टांत आहेत. श्रेणिक राजा व चलना राणी यांची कथा येथे घ्यावी.