व्रतविधि – आषाढ शु. १ दिवशीं एकमुक्ति करावी. आणि ३ दिवशीं प्रभातीं या व्रतिकांनीं पासुक उदकाने अभ्यंगस्नान करून अंगा- बर दृढौत वर्षे धारण करावीत. सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिनाल- यास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन इंर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास मक्तोनें साष्टांग नमस्कार करावा. पीठावर रत्नत्रय-अरमल्लि मुनिसुव्रत प्रतिमा स्थापून त्यांचा पंचामृतांनीं अभिषेक कराश. अष्टद्रव्यांनी त्यांचो अर्चना करावी. श्रुत व गणधर पूजा करून यक्ष, बक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अहे अरमल्लिमुनिसुव्रत तीर्थकरेभ्यो यक्षपक्षीसहितेभ्यो नमः स्वाहा ॥ या मंत्राने सुगंधी १०८ पुष्पें घालावींत, णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. नंतर एक महार्घ्य करून त्यानें ओवाळीत मंदिरास तोन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. ब्रम्हचर्यपूर्वक उपवास करून धर्मध्यानांत काल घालवावा. दुसरे दिवशीं पूजा व दान करून आपण पारणें करावें.
बाप्रमाणे नऊ ९ तृतीये दिवशीं पूजाक्रम करून शेवटीं आष्टा- न्हिकांस याचे उद्यापन करावे. त्यावेळीं रत्नत्रय जिनप्रतिमांचे विधान करून महाभिषेक करावा. चतुःसंघास चतुर्विधदाने द्यावीत. असा याचा पूर्णविधि आहे.
कथा– श्रेणिक राज्जा व चलनाराणी यांचो कथा येथे घ्यावी.