व्रतविधि– आश्विन मासांतील पहिल्या सोमवारी या व्रतिकांनीं एकभुक्ति करावी. आणि मंगळवारी प्रातःकाळीं प्रासुक उदकानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीत वस्ने धारण करावीत. सर्व पूजासामओ बरोबर घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास मक्कोने साष्टांग नमस्कार करावा. पोठावर चतुर्विंशतितीर्थंकरप्रतिमा यक्ष यक्षीसह स्थापून तिचा पंचामृतांनी अभिषेक करावा. अष्टद्रव्यानी त्यांची अर्चना करण्वी. पंचपकान्नांचे २४ चह करावेत श्रुत व गणधर पूजा करून यक्ष, मक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं चतुर्विंशतितीर्थंकरेभ्यो यक्षयक्षीसहितेभ्यो नमः स्वाहा ।। या मंत्राने सुगंधी १०८ पुर्षे घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. नंतर एका पात्रांत महाध्ये करून त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्या दिवशीं उपवास करून ब्रम्हचर्यपूर्वक धर्मध्यानांत काल घालवावा. दुसरे दिवशीं पूजा व दान करून आपण पारणें करावें.
या प्रमाणे पांच मंगळवारी है व्रतपूजन करून शेवटीं कार्तिक आष्टान्हिकांत बाचे उद्यापन करावे. त्यावेळीं चतुविशति तीर्थकराराधना करून महाभिषेक करावा. चतुः संघास चतुविध दार्ने द्यावीत. असा याचा पूर्णविधि आहे.
– कथा –
है व्रत पूर्वी सूर्यप्रभ नामक राजाने यथाविधि पाळिले होते. म्हणून त्याला स्वर्गसुख व क्रमाने मोक्षसुस्व प्राप्त झाले आहे. त्याच्या बरोबर अनेक मव्यांनीं है व्रत पाळून सद्गती मिळविली आहे. असा हा दृष्टांत आहे. श्रेणिक महाराना व चलना महाराणी यांची कथा येथे घ्यावी.