व्रतविधि-तीन नंदीवर पीपैकी कोणत्याहि एका पर्वांत हे मत ग्रहण करून पालन करता येते, त्याचा क्रम असा आहे. आषाढ़ मासांतील शु. १ दिवशी में जत प्रदण केले असतां त्या
दिवसापासून प्रत्यक्षी (प्रतिदिनी) एक मूठभर तांदूळ घेऊन ते दुसन्या एका भांड्यांत सांचवून ठेवावेत. याप्रमाणें चौदा मुष्टि तांदूळ जमा झाल्यानंतर पौर्णिमेदिवशी प्रातःकाळी सुखोष्ण जलाने अभ्यंगस्नान करून प्रतिकांनी अंगावर नूतन घौतबर्षे धारण करावीत. सर्व पूजा- साहित्य बरोबर घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धि वगैरे क्रिया कराव्यात. जिनेश्वरांस भक्तीनें नमस्कार करावा. श्रीपीठावर जिनेश्वराची प्रतिमा यक्ष यक्षी सहित स्थापून तिळा पंचामृतांनी अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी अर्चना करावी. श्रुत व गणवर यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे. चौदादिवसपर्यंत जमा केलेल्या चौदामुष्टी तादळांचे नैवेद्य करून ओवाळावें. तो दिवस ब्रम्हचर्यपूर्वक उपवासांत व धर्मध्यानांत घालबाबा. ॐन्हीं श्रीं क्लीं ऐं अई परमब्रम्हणे अनंतानंतज्ञानशक्तये अईत्परमेष्ठिने यक्षयक्षीसहितेभ्यो नमः स्वाहा ॥ १०८ ॥ या मंत्राने १०८ पुष्पें घालावीत. श्रीजिनसहस्रनामस्तोत्र म्हणून णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचात्री. शेवटी महार्घ्य करून ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. रात्री शास्त्रस्वाध्याय करावा. दुसरें दिवशीं जिनपूजा करून सत्पात्रांस ( तपस्त्रीजनांस ) आहारदान देऊन आपण पारणा करावी.
याचप्रमाणे आषाढ कृ० ३० दिवशी सर्वपूजाविधि करावा. या प्रमाणें आषाढमासीं पूजा केली असतां सौधर्मकल्प नामक द्वादश सहस्र (१२०००) उपवासांचे फळ मिळते. त्यानंतर श्रावणमासांतील दोन्हीपक्षामध्ये पूर्वी सांगितल्याप्रमाणे सर्व पूजाविधी पूर्ण केला असतां ईशानकल्प नामक षोडशसहस्र (१६०००) उपवासांचे फल मिळते. तसेंच भाद्रपद मासांतील दोन्हीपक्षांत पूर्वोक्त सर्व पूजाक्रम केला असतां सनत्कुमार नामक विंशतिसहस्र (२००००) उपवासांचे फळ मिळतें. पुनः आश्विनमासांतील दोन्हीपक्षांत पूर्वीप्रमाणें सर्वपूजाविधि केला असतां माहेंद्रकल्प नामक द्वाविंशतिसहस्र (२२०००) उपवा- सांचे फल प्राप्त होतें.
याचप्रमाणें पुढील मासांत म्हणजे कार्तिकांत पूजा केळी असतां लांतवकल्प नामक त्रिंशत्सहस्र (३००००) उपवासांचे; मार्गशीर्षात- कापिष्टकल्प नामक द्वात्रिंशत्सहस्र (३२०००) उपवासांचे; पौषांत- शुक्रकल्प नामक चतुस्त्रिंशत्सहस्र (३४०००) उपवासांचें; माघांत – महाशुक्रकल्प नामक षट्त्रिंशत्सहस्र (३६०००) उपवासांचे; फाल्गु- नांत – शतारकल्पे नामक अष्ट त्रिंशत्सहस्र (३८०००) उपवासांचे; चैत्रांत-सहस्रारकल्प नामक चत्त्वारिंशत्सहस्र (४००००) उपवा- सांचें; वैशाखांत – आणतकल्प नामक द्वित्चत्त्वारिंशत्सहस्र (४२०००) उपवासांचें; प्राणतकल्प नामक षष्ठिसहस्र (६००००) उपवासांचे फल प्राप्त होत असतें.
याक्रमानें बारा १२ महिनें हें व्रत पूर्ण पालन करावें. क्रोध, मान, माया, लोभ व मत्सर हे मानसिक विकार सोडावेत. पंचाणुव्रतें, तीनगुणव्रतें, चार शिक्षाव्रतें पाळावीत. बारामासिक पूजा पूर्ण झाल्यावर शेवटीं याचे उद्यापन करावें. त्यावेळीं नूतन जिनप्रतिमा तयार करवून तिची पंचकल्याणपूर्वक प्रतिष्ठा करावी. त्यासमयीं बाराप्रकारची नैवेद्ये, फलें पुष्पें, सुवर्णकमळे हीं तयार करवून एका पत्रांत अष्ट-
द्रव्यांसह ठेवून घेऊन महार्ण्य करावें आणि त्यानें ओषाळींत मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन मंगळारती करावी. मंदिरांत आवश्यक जयघंटा, धूपारती, दीपारती वगैरे बारा प्रकारची उपकरणें ठेवावीत. बारा मुनींना आहारदान देऊन त्यांना बारा शाखें अर्पण करावीत. तसेंच आर्थिका- नाहि वस्त्रादिक द्यावें. आणि श्रावक श्राविका यांनाहि बत्र वगैरे करावें. यक्ष, यक्षौ यांना शक्तीप्रमाणे चांदीची नेत्रे करवून घाढावीत. असा या मताचा पूर्ण विधि आहे.
हे व्रत जो भव्य मानव भक्तीनें ग्रहण करून यथाविधी पाटन करितो; त्याचे गृहक्कृत्यांत होणारे सर्व दोष दूर होऊन त्याला अपूर्व पुण्याचे आस्रव होतात. त्यायोगानें पुढील जन्मीं सद्गति मिळते. पुरुष पंचकल्याणभागी होतो. स्त्री पुढच्या जन्मीं खिडिंग छेदून पुरुष- पर्याय धारण करित्ये आणि क्रमानें मोक्षाधिकारी होते. असा या व्रताचा प्रभाव आहे.
कथा मगधाधिपति श्रेणिक महामंडलेश्वर हे आपल्या राजगृह नगरांत चेलनादि परिवारजनांसह सुखानें राज्यैश्वर्य भोगात असतां – एकेदिवशीं त्रिगुप्त नामक भट्टारक महामुनि हे चर्यानिमित्तानें मार्गातून निघाले आहेत; हे पाहून चेलना महादेवीनें त्यांचे पुढें जाऊन त्यांना नमस्कार करून तीन प्रदक्षिणा घालून प्रतिग्रहण केलें; आणि भूमिशुध्यादि क्रिया करीत पाकगृहीं नेऊन उच्चासनीं बसविलें, पादप्रक्षालन करून अष्टद्रव्यांनीं त्यांची अर्चना केली. भक्तीनें प्रणाम करून त्रिकरणशुद्धिपूर्वक प्रासुक आहार दिला. निरंतराय आहार झाल्यावर ते मुनीश्वर एका आसनावर विश्रांत्यर्थ बसले. तेव्हां चेळनादेवी आपले दोन्ही हात जोडून विनयानें त्यांना म्हणाली, – भो भवतारक महामुने ! आज आपण आम्हांस या गृह- व्यापारामध्ये जे अनेक हिंसा दोष घडतात; त्यांचा परिहार होण्याकरितां एकादें व्रतविधान निरूपण करावें. हें तिचें विनयपूर्ण वचन ऐकून ते मुनी
म्हणाले, हे भव्य कन्ये! करण्यास अयंत उचित आहे. सांगितला. तेव्हां चेलनादेवीस जवळ हैं व्रत नमस्कार करून आतां तुजला मुष्टितंदुलव्रत हैं पालन असे म्हणून त्यांनी तिला सर्व व्रतविधी अत्यंत आनंद झाला. मग तिनें त्यांच्या- ग्रहण केलें. नंतर ते त्रिगुप्तमुनीश्वर तेथून निघून गेले.
पुढें कालानुसार तिनें हैं व्रत यथाविधी पाळून शेवटीं त्याचें उद्यापन केलें. या व्रताच्या पुण्यफलानें ती आर्यिकावस्थेत समाधि साधून सद्गतीस गेली.