व्रतविधि – श्रवणमासी श्रवणनक्षत्र ज्या दिवशी असेल त्यादिवशी या मत धारकांनी उष्णोदकाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढभौत वने धारण करावीत सर्व पूजा द्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास मक्तीने साष्टांग नमस्कार करावा. पीठावर पद्मप्रभ तीर्थकर प्रतिमा कुसुमंबर यक्ष मनोवेगा यक्षीसद स्थावून तिला पंचामृतांनीं अभिषेक करावा, अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे. देवापुढे एका पाटावर सहा स्वस्तिकें काढून त्यांवर सहा पार्ने क्रमाने मांडून त्यांच्यावर अक्षता, फुले, फलें, केळीं नैवेधे वगैरे ठेवावे. पुढे मिर्जाव- लेल्या दरमन्यांचे पुंज, हळद, कुंकु, हवनसूत्रे (होन्नूल) ठेवावीत. श्री, व्ही, घृति, कीर्ति, बुद्धि व लक्ष्मी या सहा देवतांच अष्टद्रव्यांनीं मथोचित मंत्राने अर्चन करावे. मूलस्वामी, सरस्वती, गणधर आणि या सहा देवता यांना नऊ प्रकारच्या भक्ष्यांचे नऊ चरु करावेत. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं पद्मप्रम तीर्थंकराय कुसुमवरयक्ष मनोवेगायक्षीसहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ कमलपुष्पें घालावींत, णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. नंतर सहा पार्ने एका पात्रांत लावून त्यांवर अष्टद्रव्यें व एक नारळ ठेवून महार्घ्य करून त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. मग चोवीस तीर्थकर स्तुति व प्रतिक्रमण म्हणून देवापुढे ठेवलेलीं ती हवनसूत्रे स्त्रियांनीं आपल्या कंठांत धारण करून गुरूंचा आशिर्वाद घेऊन घरीं जावें. हे व्रत करणारे पुरुष असतात तेव्हां त्यांनीं जिनेश्वरांचा अभिषेक यज्ञोपवीतासह झाल्यावर होमविधि करावा. बाकी सर्वविधि पूर्वी सांगितल्याप्रमाणे करावा. यज्ञोपवीत आपल्या कंठांत घालतांना ॐ ह्रीं सम्यग्दर्शनज्ञानचारित्राय नमः स्वाहा ॥ हा