व्रतविधि – आषाढमासांतील नंदीश्वरपर्यंत या बतिकांनीं प्रथमतः सप्तमी दिवशीं एकमुक्ति करावी. अष्टमीदिनीं प्रभातीं अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीत वस्ने धारण करावीत. सर्व पूजा द्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि पूर्वक जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग प्रणिपात करावा, पीठावर पंचपरमेष्ठीची प्रतिमा स्थापून तिला पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनीं त्यांची अर्चना करावी, श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष, यही व महादेव यांचे अर्चन करावे. एका पाटावर देवा पांच मंडन त्यांवर अक्षता, फले, फुले, सुपाच्या नेवये वगैरे कावावीत, ॐ दां हीं न्ह न्हीं छः असिआउया स्वाहा ॥ या मंत्राने सुर्मधी पांढरी पुष्पे १०८ घालावीत णमोकार मंत्राचा जप १०८ वेळां करावा. ही व्रतकथा वाचावी. एका पात्रांत पांच पार्ने क्रमाने कावून त्यावर अष्टद्रव्ये आणि एक नारळ ठेवून त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगहारती करावी, त्यादिवशी उपवास करार्वा. नक्ष- चर्यपूर्वक धर्मध्यानांत काळ घालवावा. दुसरे दिवशी पूजा क दान करून आपण पारणा करावी. (उपवास होत नसल्यास तीन दिवस एकाशन करावें.) याप्रमाणे चार महिने त्याच तिथीस अष्टमील (अष्ट- मीस) पूजा करावी. शेवटीं कार्तिक आष्टान्हिकांत याचे उद्यापन करावे. त्यावेळीं पंचपरमेष्ठो विधान करून महाभिषेक करावा. चतुः संघास चतुर्विध दाने द्यावीत. असा याचा पूर्णविधि आहे.
कथा – श्रेणिकराज्चा चलनाराणी यांचीच कथा येथे घ्यावी.