व्रतविधि – आश्विन कृ. १२ दिवशीं या व्रतिकांनीं एकमुक्ति करावी. आणि १३ दिवशीं प्रातःकाळीं सुखोष्णजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्ने धारण करावीत. सर्व पूजा द्रव्ये बरोबर घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि- पूर्वक जिनेंद्रास मक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. पीठावर सुतिनाथ तीर्थकर प्रतिमा तुंचरु यक्ष व पुरुपदत्ता यक्षीसह स्थापून तिला पंचा- मृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे.
ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं सुमतिनाथतीर्थकराय तुंवरुयक्षपुरुषदत्तायक्षीसहिताय नमः खाहा ॥ या मंत्राने १०८ पुणे घालावीत. णनोकार मंत्राचा जप १०८ वेळां करावा. ही व्रतकथा वाचावी. नंतर एका पात्रांउ पांच पार्ने क्रपाने लावून त्यावर अष्ट द्रव्ये व एक नारळ ठेवून महार्घ्य करून त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्या दिवशी उपवास करावा. बम्ध्चर्यपूर्वक धर्मध्यानांत काल घालवावा. दुसरे दिवशीं पूजा व दान करून आपण पारणे करावे.
यापमाणे पांच महिने त्याच तिथीस हे व्रतपूजन करून शेवटी याचे उद्यापन करावे. त्यावेळीं सुमत्तिनाथ तीर्थंकरविधान करून महा- भिषेक करावा. चतुःसंघाप्त चतुर्विध दाने द्यावीत. असा याचा पूर्णविधि आहे.
कथा – श्रेणिक महाराज आणि चलनादेवी यांची कथा येथे घ्यावी.