व्रतविधि-मार्गशीर्ष कृ. ९. दिवशी या बत आइकांनी एकभुक्ति करावो. आणि १० दिवशी प्रातःकाळी प्रालुक्क उदकाने अध्य स्नान करून अंगावर दृढबौत वर्षे धारण करावीत, नगा सर्व पूजा सामग्री आपल्या हातीं घेऊन जिनालयास जावे, तेथे गेल्यावर मंदि रास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्षापयशुद्धि वगैरे क्रिया कराव्यात. श्रीजिनेंद्रास भक्तीने साष्टांग नमस्कार करावा, नंदादौर कावाया. श्रीपीठावर श्रीपचपरमेष्ठी प्रतिमा स्थापून त्यांचा पंचामृतांनी अभिषेक करावा. एका पाटावर पांच स्वस्तिके काढून त्यांर पांच पाने मोडून त्यांच्यावर अष्टद्रव्ये ठेवावीत. मग पंचपरमेष्ठींची अश्वके, क्षेत्रे, जय- माला हीं म्हणत अष्टद्रव्यांनी त्यांची पूजा करावी. आणि १ ॐ ह्रीं अर्हं गर्भावतारकल्याणपूजिताय श्रीजिनेंद्राय नमः स्वाहा ॥
२ ॐ ह्रीं अर्हं जन्माभिषेककल्याणपूजिताय श्रीजिनेंद्राय नमः स्वाहा ॥ ३ ॐह्रीं अर्हं दीक्षाकल्याणपूजिताय श्रीजिनेंद्राय नमः स्वाहा ॥ ४ ॐ ह्रीं अर्हं केवलज्ञानकल्याणपूजिताय श्रीजिनेंद्राय नमः स्वाहा ॥ ५ ॐ ह्रीं अर्हं निर्वाणकल्याणपूजिताय श्रीजिनेंद्राय नमः स्वाहा ॥ यांतील प्रत्येक मंत्रानें क्रमानें अष्टद्रव्यांनीं अर्चना करावी. नंतर श्रुत व गुरु यांचे पूजन करावें. मग यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांची अर्चा करात्री पंचपकान्नांचे चरु करावेत. ॐ ह्रीं अर्हं असिआउसा पंचकल्याण पूजितेभ्यः श्रीजिनेंद्रेभ्यो नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुष्पें घालावींत. णमोकार मंत्राने १०८ जप करावेत. श्रीजिनसहस्रनामस्तोत्र म्हणून शास्त्रस्वाध्याय करावा. ही व्रतकथा ही वाचावी. मग एका पात्रांत पांच पार्ने मांडून त्यांवर अष्टद्रव्ये आणि एक नारळ ठेवून महार्घ्य करावें. आणि त्यानें ओवा- ळोत तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्यादिवशी उपवास करून धर्मध्यानांत काल घालावावा. सत्पात्रांस आहारादिदाने द्यावीत. दुसरे दिवशीं पूजा व दान करून मग आपण पारणे करावें. तीन दिवस ब्रम्हचर्य पाळावे.
याच प्रमाणें पांच दशमीस पांच पूर्ण झाल्यावर शेवटीं या व्रताचे उद्यापन करावें. त्यावेळीं पंचपरमेष्ठीविधान करून महाभिषेक करावा.
चतुःसंघास चतुर्विधदानें द्यार्थीत. असा या व्रताचा पूर्णविधि आहे.
हे व्रत पूर्वी सुग्रीव राजानें यथाविधि पाळून त्यांचे उद्यापन केले. होते, त्यामुळे त्याला सर्व संसार सुखें प्राप्त होऊन शेवटीं ते सद्ग- तीस गेले, असा दृष्टांत आहे,
कथा – श्रेणिकराजा व चलनाराणी यांचीच कथा येथे ध्यावी.