व्रतविधि – कार्तिक शु. १ पासून ५ पर्यंत पांच दिवस या श्रतिकांनीं प्रातःकाळों शुद्धोदकाने तैलाभ्यंगस्नान करून अंगावर नूतन धौत बस्ने धारण करावीत. सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तोन प्रदक्षिणा देऊन ईर्पापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीने साष्टांग प्रणाम करावा. नंदादीप लावावा. पीठावर पंचपरमेष्ठो प्रतिमा, सरस्वतो प्रतिभा, गणधर पादुका व पद्मावती प्रतिमा स्थापून त्यांचा पंचामृतांनी अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांचो अर्चना करावा. ॐ ह्रॉँ ह्रीं ह्रों ह्रौं ह्रः अर्हत्सिध्याचार्योपाध्यायसर्वसाधुभ्यो नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुष्र्षे घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जर करावा. ही व्रतकथा वाचावी. एका पात्रांत पांच पाने मांडून त्यांवर अष्टद्रव्ये व एक नारळ ठेवून महार्घ्य करून त्याने ओंवाळीत मंदिरात प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. सत्पात्रांस आहारादि दाने द्यावीत. ब्रह्मचर्यपूर्वक उग्वासादिक करावें. सायंकाळीं सरस्वती व पद्मावतीदेवी यांना उच्च वस्त्रालंकारांनीं विभूषित करून त्यांची प्रार्थना करावी. दुसरे दिवशीं पूजा दान करून आपण पारणे करावे.
याप्रमाणें पांच वर्षे है व्रतपूजन करून शेवटीं याचे उद्यापन करावे. त्यावेळीं पंचपरमेष्ठी विधान आणि पद्मावतोविधान करून महाभिषेक करावा. चतुःसंघास चतुर्विधदाने द्यावीत. असा याचा पूर्णविधि आहे.
कथा – श्रेणिक राजा व चलना राणी यांचीच कथा येथे घ्यावी