व्रतविधि – चैत्र शु. १ ते ३ पर्यंत तीन दिवस या व्रतिकांनीं प्रातःकाळीं सुखोष्ण जलानें तैलाभ्यंगस्नान करून अंगावर नूतनधीतवस्खें धारण करावीत. सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापयशुद्धिपूर्वक जिनेंद्रास मक्तीने साष्टांग नमस्कार करावा, पीठावर आदिनाथ तीर्थकर प्रतिमा गोमुख यक्ष व चक्रेश्वरी यक्षोसह स्थापून तिला पंचामृतांनी अभिषेक करावा. अष्टद्र- व्यांनी त्यांचो अर्चना करावी, श्रुत व गगभर पूजा करून यक्ष, यही व बम्हदेर यांचे अर्चन करावे. नंदादीप लावावा. नित्य सरस्वती व पद्मावती देवी यांना वश्वव्लंकारांनी विभूषित करून सायंकाळीं प्रार्थना करावी. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं आदिनाथतीर्थंकराय गोमुखयक्ष चक्रेश्वरीयक्षीसहिताय नमः स्वाहा ।। या मंत्राने १०८ पुष्पें घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. श्रीजिनसहस्र- नामस्तोत्र म्हणून ही व्रतकथा वाचावी. नंतर एक महाये करून त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. तीन दिवस कांजिकाहार एकवेळ घेऊन ब्रम्हचर्यपूर्वक धर्मध्यानांत काल घालवावा.
यापमाणे हे व्रत तीन वर्षे करून अंतीं याचे उद्यापन करावे. त्यावेळीं आदिनाथदिधान-भक्तामर विधान करून महाभिषेक करावा. चतुःसंघास चतुर्विध दाने द्यावीत. सहस्रनाम विधान केल्यासहि चालेल. असा याचा पूर्णविधि आहे.
– कथा –
याच भरत क्षेत्रांत त्रिलोकतिलक नांवाचे सुंदर नगर आहे. तेथे जयवर्म नाने एक राजा राज्य करीत असे. तो अयंत पराक्रमी, गुण- वान्, नीतिमान्, असल्याने पुत्रवत् आपली प्रजा पाळीत होता. त्याला जयावती नामक एक पट्टराणी होती. ती मोठी गुणो, सुशील व श्रद्धालु होती. इच्या उदरीं लक्ष्मीमति नांवाची एक सुंदर कन्या जन्मलो होती. तीही मोठो गुणवतो, सम्यक्त्री, सुशील अशी होती. हे सर्व जन इष्टमित्रादिकांसह तो राजा सुखाने कालक्रमण करीत असतां, एके दिवशीं यशोधर नामक महामुनी चर्षेकरितां प्रासादांत आले. तेव्हां राजाने त्यांना यथाविधि पडघावून आपल्या गृहीं नेलें. आणिनवधामक्तीनें निरंतराय आहार दिला. नंतर एका आसनावर मुनींश्वर शांत बसले आणि धर्माचा उपदेश करूं लागलें. नग राजाने त्यांना मोठ्या विनयाने प्रश्न केला की- हे संसारसिंधुतारक स्वामिन् ! आमच्या या लक्ष्मीमती कन्येस उत्तम वर कोण मिळेल ? तो कोण- त्यारीतीनें केव्हां प्राप्त होईल? है कृपा करून सांगा. हे ऐकून ते मुनी म्हणाले – हे भव्यचूडामणे राजन् ! या भरतक्षेत्रामध्ये कनकपुर नांवाचे एक मनोहर नगर आहे. तेथे जयंधर नांवाचा एक मोठा पराक्रमी व गुणशाली अता राजा राज्य करीत असे. त्याला पृथ्वीदेवी नांवाची अत्यंत रूपवती व गुणवती अशी राणो आहे. इच्यापासून नागकुमार नांवाचा एक अत्यंत रूपवान्, गुणवान् असा पुत्र झाला आहे. तो या तुमच्या कुमारीस वर होणार आहे. पुढे तो आपल्या पराक्रमानें महामंडलेश्वर होणार असून त्याची ही तुमची कन्या पट्टराणी होणार आहे. तेव्हां आतां तुम्ही तिच्या करवीं है मंगलभूषण व्रत करवा. म्हणजे आजपासून तीन वर्षांनीं तिला उत्तम वराची प्राप्ती होईल. है मुनींचे वचन ऐकून सर्वांना मोठा आनंद झाला. मग त्यांनीं आपल्या कन्थेला त्यांच्या हस्ते व्रत देववून या व्रताचा सर्वविधि ऐकविला. त्यायोगानें तीं कन्या तीन वर्षे हैं व्रत यथावत् करून त्या नागकुमार राजाजी पट्टराणी झाली, संसारसुखाचा पूर्ण अनुभव घेऊन तिर्ने पुढे एका आर्यिकाबाईजवळ आर्यिकेची दीक्षा घेतली. घोरतप- श्वरण करून त्या व्रत आणि तप प्रभावाने ती समाधिविधिर्ने देह त्याग करून स्वर्गात देव झाली. पुढें क्रमाने तिर्ने सद्गति साधिली.