व्रतविधि-वैशाख शु. १ ते ३ पर्यंत तीन दिवस या ब्रलि- कांनीं प्रासुक उदकानें तैलाभ्यंगस्नान करून अंगावर नूतन धौतवले धारण करावींत. सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जावें.
मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. पीठावर आदिनाथ तीर्थकर प्रतिमा गोमुख यक्ष चक्रेश्वरी यक्षीसह स्थापून तिला पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें. नंदादीप लावावा. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं आदिनाथतीर्थं कराय गोमुखयक्ष चक्रेश्वरी यक्षीसहिताय नमः स्वाहा ।। या मंत्राने १०८ पुष्पें घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. नंतर एक महार्घ्य करून त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी, शक्तिप्रमाणे उपवासादिक करावें. ब्रम्हचर्यपूर्वक धर्मध्यानांत काल घालवावा. सत्पात्रांस आहारादि दानें द्यावींत.
या प्रमाणे हे व्रतपूजन तीन वर्षे केलें असतां उत्तम, तीन महिने केलें असतां मध्यम आणि तीन पक्ष केले असतां जघन्य होते. आपल्या शक्तीप्रमाणे करून शेवटीं याचे उद्यापन करावें, त्यावेळीं आदिनाथ- विधान अथवा भक्तामर विधान करून महाभिषेक करावा. चतुःसंघास चतुर्विध दार्ने द्यावीत. असा याचा पूर्णविधि आहे.
– कथा –
शूरसेन देशांत उत्तरमथुरा नांवाचे एक नगर आहे. तेथे पूर्वी जयवर्म नांवाचा राजा आपल्या जयावती राणीसह सुखाने राज्य करीत होता. एकदां राणीने एका गुरुजवळ हे पर्वमंगल व्रत घेऊन यथाविधि पाळिलें. त्या योगाने तिला व्याळ व महाव्याल या नांवाचे दोन पुत्र झाले. संसार सुखाचा झाला. पुढें तिच्या मनांत वैराग्यभावना आल्यामुळे तिने एका आर्थिकेसमीप जाऊन आर्थिकेची दीक्षा घेतली. नंतर खडतर तपश्चर्या करून त्या व्रत व तप प्रभावाने ती स्वर्गात देव झाली आणि क्रमानें मोक्षास गेली.