व्रतविधि – आश्विन शु. १३ ते १५ पर्यंत तीन दिवस या ब्रतिकांनीं प्रातःकाळो शुचिजलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीत- वने धारण करात्रीत. सर्व पूजाद्रव्ये हाती घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन इंर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करात्रा, पीठावर रत्नत्रय जिननतिमा यक्ष यक्षोसह स्थापून त्यांचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. नंदादीप लावावा. अष्ट- द्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. पंचपकानाचे चरु करावेत. श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं रत्नत्रयजिनदेवेभ्यो नमः स्वाहा ।। या मंत्राने १०८ पुष्पें घालावींत. श्री जिनसहस्रनामस्तोत्र म्हणून णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. एका पात्रांत नऊ पार्ने लावून त्यांवर अष्टद्रव्ये आणि एक नारळ ठेवून महार्घ्य करून त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. सत्पात्रांस आहारादि दाने द्यावींत. यथाशक्ति उपवासादिक करून ब्रम्हचर्यपूर्वक धर्मध्यानांत काल घालवावा.
याप्रमाणें हे व्रत पांच वर्षे करून शेवटीं याचे उद्यापन करावे. त्यावेळीं रत्नत्रय जिन प्रतिमांना महाभिषेक पूजा करावी. चतुःसंघास चतुर्विध दानें द्यावीत. असा याचा पूर्ण विधि आहे.
कथा- है ब्रत पूर्वी श्रीषेण राजाने केले होतें. त्या योगानें त्याला चक्रवर्तित्व वैभव प्राप्त झाले आहे. श्रेणिक राजा व चलनाराणी यांचीच कथा येथे घ्यावी.