व्रतविधि – आषाढ, कार्तिक, फाल्गुन या मासांतील आष्टान्हिक पर्वांत प्रभातीं या ब्रतिकांनीं शुचि जकानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीतवस्ने धारण करावीत. सर्व पूजा द्रव्ये हाती घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास मक्तीनें साष्टांग नमन करावे. पीठावर जिनप्रतिमा नंदीश्वर बिंबासह स्थापून त्यांचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यानी त्यांची अर्चना करात्री. श्रुत व गणधर यांचो पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे. नंदादीप लावावा. ॐ ह्रीं अर्हं समस्त जिनचैत्यचैत्यालयेभ्यो नमः स्वाहा ।। या मंत्राने १०८ पुब्र्षे घालावींत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. एका पात्रांत आठ पार्ने क्रमाने लावून त्यांवर अष्टद्रव्ये ठेवून महार्घ्य करून त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. यथाशक्ति ब्रम्हचर्य पूर्वक उपवासादिक करून धर्मध्यानांत काल घालवावा. सत्पात्रांस आहारादि दाने द्यावींत.
या प्रमाणें आठ दिवस पूजाक्रम एका वर्षातील तिन्ही अष्टान्हिक- पर्वांत करावा. शेवटीं महाभिषेक करून उद्यापन करावें. असा याचा पूर्णविधि आहे.
– कथा –
धन्यकुमार श्रेष्ठोने है व्रत यथाविधि पाळिले. त्या योगानें तो स्वर्गादि सुर्खे भोगून सद्गतीस गेला. हा दृष्टांत आहे. श्रेणिक व चलना यांचीच कथा येथे घ्यावी.