व्रतविधि-आषाढ, कार्तिक, फाल्गुन या मासांत येणाऱ्या कोणत्याहि नंदीश्वरपर्वात पूर्णिमेदिवशीं या व्रतिकांनीं प्रभातीं शुद्धोदकानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वर्षे धारण करावींत. सर्व पूजा- साहित्य करीं घेऊन जिनालयीं जावें. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धि वगैरे क्रिया करून जिनेंद्रास भक्तीनें वंदना करावी. श्रीपीठावर चोवीस तीर्थकरांची प्रतिमा यक्ष यक्षीसहित स्थापून पंचामृतांनीं तिला अभिषेक करावा. त्यांचीं अष्टकें, स्तोत्रे, जयमाला हीं म्हणत अष्टद्रव्यांनी अर्चना करावी. ॐ हीं श्रीं क्लीं ऐं अई वृषभादिवर्धमानांत वर्तमान चतुर्विंशतितीर्थकरेभ्यो यक्षयक्षीसहितेभ्यो नमः स्वाहाः ॥ १०८ ॥ या मंत्रानें १०८ पुष्पें घालावींत. श्रुत व गुरु यांची पूजा करावी. यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें. जिनसहस्त्रनामस्तोत्र म्हणून णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करून ही व्रतकथा वाचावी. नंतर एका पात्रांत २४ पानें लावून त्यांवर अक्षत पुंज, फळें, फुले वगैरे द्रव्यें प्रत्येकीं चोवीस लावून महार्घ्य करून त्यानें ओवाळीत मंदिरास तीनप्रदक्षिणा घालून मंगळारती करावी. नंतर घरी जाऊन मुनीश्वरांना आहारदान देऊन
त्यांच्या जवळ तीर्थकरांची नांवें सांगून घेऊन मग आपण एकमुक्ति कराची. नित्य जिनेंद्रास अभिषेक करावा. नित्य भोजन करितांना, तांबूल सेवन करितांना, पाणी पितांना, हे आणत्तिव्रत सांगून म्हणजे त्रिकाल तीर्थकरांची नांवें उच्चारून करावें; आपणांस येत नसल्यास दुसऱ्यांकडून ५ वेळां उच्चारून घेऊन नंतर आपण भोजनादि करावें.
याक्रमाने हे व्रत सहा वर्षे पाळून याचें उद्यापन करावे. त्यावेळीं चोवीस तीर्थकरांची प्रतिमा यक्ष यक्षीसह तयार करवून तिची पंचक- ल्याणपूर्वक प्रतिष्ठा करावी. २४ वायनें बांधावीत. तीं अशी ४८ सुपें आणवून तीं धुवावीत. त्यांस हळदीचे चूर्ण काळवून लावावें. त्यांमध्यें भिजलेले हरमरे, अष्टद्रव्यें, मीठ- शेंदेलोण, करंज्या, फलें, पुष्पें, पार्ने इत्यादि चोवीस वस्तु घालून वरती सूप झांकून त्यांवर पत्रांनीं झांकून वर सूत गुंडाळावें. परमान्न पायसाचे २४ चरु करावेत. देव, गुरु, शास्त्र, पूजकाचार्य, व सुवासिनी स्त्रियां यांना देऊन आपण घरीं दोन घेऊन जावें. २४ मुनींना आहारदान देऊन त्यांना आवश्यक पुस्त- कादि वस्तु द्याव्यात. देवापुढें एक चौरंग ठेवून त्यावर चोवीस हात लांबीचे नूतन धौत वस्त्र पसरून त्यावर चोवीस तीर्थकरांची प्रतिमा स्थापून त्यांचीं अर्चना क्रमानें करावी. वायनदान मंत्र – ॐ नमोऽईद्भ्यो चतुर्विंशतितीर्थकरेभ्यो सौभाग्येष्टसिद्धिं कुरुत २ स्वाद्दा ॥ हा मंत्र म्हणून वायन द्यावें. असा याचा पूर्ण विधि आहे.
या व्रताच्या फलानें सर्व विप्नांचा नाश होतो. सौभाग्य व दीर्घा- युष्य प्राप्त होतें.
कथा –
चतुर्विंशतितीर्थेशान् । चतुर्गतिनिवारकान् ॥
निर्वाणसाधकान् बंदे । सर्वजीवदयाकरान् ।।
या जंबूद्विपांतील भरतक्षेत्रांत अवंति नांवाचा एक विशाल देश आहे. त्यांत चंपापूर नांत्राचे एक पट्टण आहे. तेथें पूर्वी भूपाल नामक
राज्यैश्वर्य भोगीत असे. त्याला पट्टराण्या होत्या. त्या दोघीही एक वीर्यशाली व गुणवान् असा राजा सुप्रभा व मनोहरा या नांवाच्या दोन नामानुसार सुंदर, रूपवती, गुणवती होत्या. या श्रीयुगळासह तो अत्यंत सुखानें राज्य करीत होता.
एकेदिवशीं या नगराच्या बहिरुथानांत एक दिव्यज्ञानी महातपस्वी येऊन उतरले. हैं शुभवृत्त तेथील वनपालकाच्या द्वारे राजाला फळांच तो आपल्या नगरांत आनंदमेरी देववून सर्व परिजन व पुरजन यांसह पादमार्गे चालत त्या उद्यानांत गेला. तेथे गेल्यावर त्या मुर्तीना तीन प्रदक्षिणा घालून भक्तीने वंदना करून सर्वजनासह त्यांच्या समीप जाऊन बसला. कांहीं वेळ धर्मोपदेश ऐकल्यानंतर मोठ्या विनयानें आपले दोन्ही हात जोडून मुनीशाना म्हणाला, भो महातपस्विन् ! आज आपण आम्हांस एकादें व्रतविधान कथन करावें. हे त्यांचे नम्र वचन ऐकून ते मुनिराज म्हणाले, – हे राजन् ! या कर्मभूमींत उत्सर्पिणी व अवसर्पिणी कालामध्ये त्रिकाल तीर्थकर होत असतात. ते पंचकल्याणाचे अधिकारी असतात. त्याचप्रमाणे भरतक्षेत्रांतील आर्यखंडांत कृतयुगाच्या आरंभी वृषभनाथ तीर्थकर झाले. त्यांना जेव्हां केवलज्ञान झाले. तेव्हां भरत चक्रवर्ति हे आपले परिजन व पुरजन यांच्यासह वर्तमान मोठ्या समारंभानें कैलास पर्वतावर त्या आदिनाथ तीर्थकरांच्या समवसरण सभेत गेले. त्यासमयीं ते त्यांच्या चरणकमलीं भक्तीनें बंदनादि क्रिया करून मनुष्य कोठ्यांत जाऊन बसले. त्यावेळीं वृषभनाथ तीर्थकरांच्या दिव्यवाणींतून प्रकट होणाऱ्या सद्धर्माचा उपदेश कांहीं वेळ ऐकल्यानंतर ते भरत राजेंद्र आपले दोन्ही करयुग विनयानें जोडून वृषभसेन गणधर स्वामींस म्हणतात, – भो संसारसागरोत्तारक महागुरो ! आज आपण आम्हांस सुगति सुखाला कारण अशी कांहीं व्रतविधानें सांगावीत. ही त्यांची नम्रोक्ती ऐकून ते वृषभसेन गणेंद्र त्यांना म्हणाले, – हे भव्य चक्रवर्ति राजेंद्र ! आतां तुम्हांस पालन करावयास अत्यंत उचित अशीं
तीनशे ३६० साठ बर्ते आहेत. तीं सर्वच सद्लातिसाक्षक आणि उत्कृष्ट पुण्यप्रर्द आहेत. कालक्रमाला अनुसरून विभिपुरःसरु पालन व उद्यापन करीत ‘जा; म्हणजे त्यांच्या पुण्यप्रभावें इहलोकी तूं सर्व साम्राज्याचा सुखानें अनुभव घेऊन याच भवीं मुक्त होशील. हे सर्व कथन ऐकून त्यांना अतिशय संतोष वाटल्य.. मग. त्या सर्व व्रतांचीं विधानें अगैरे जाणून घेऊन ते आपल्या नगरी आलें. पुढें तीं सर्व व्रतें त्यांनी काळानुसार यथाविधी पाळून त्यांची उद्यापनें केलीं त्यांतील हे’ आणतिव्रत ‘ (पौर्णिमाव्रत) जेव्हां त्या भरतेशांनी पाळून उद्यापन केलें, त्यावेळीं कैलासगिरीवर २४ जिनचैल्यमखयें बांधवून त्यांत जिनबिंबांची स्थापना केली, वगैरे दृष्टांत देऊन सर्व व्रतविधी मुनीश्वरांनी सांगितला.
तेव्हां मनोहरा सणीनें हें व्रत त्यांच्या सन्निध ग्रहण केलें. मग सर्वहि लोक त्या मुनींद्रास अक्तीनें नमस्कार करून. आपल्या, नगरी पुरत आले. पुढे त्या मनोहरा राणी कालानुसार हें व्रत पाळू लागली. हें पाहून त्या थोरल्या सुप्रभा राणीला फार वाईट वाटू लागले.
एकदां भूपाल महाराज हे दिग्विजयासाठीं प्रयाणभेरी देवद्युत आनंदानें शुभ मुहूर्तावर निघाले त्यादिवशीं आपल्या सुप्रभा सार्णास स्वयंपाक करावयास सांगितलें. तेव्हां तिनें विचारलें कीं; – हे प्राणनाथ! आज आपण जें भोजन करणार त्यांतील शेषान्न कोणास देणार ? हैं तिचें भाषण ऐकून ते म्हणाले, – हे प्राणप्रिये! आज जें शेषाल राहील तें तुझ्या बहिणीचे आहे. हे त्यांचे भाषण ऐकतांच तिला अप- मानास्पद वाटल्यामुळे तिनें त्यांच्यावर विषप्रयोग करावा अशा दुर्बुद्धीनें विषमिश्रित अन्न तयार करविलें. राजाला भोजनाकरितां पाचरण केलें. तेव्हां महाराज येऊन आपले हातपाय ( पादपाणी) प्रक्षाळन करून भोजनासाठीं आसनावर बसले. त्यांच्यापुढें अड्डुणगी (भोजनपात्रा- खालीं ठेवण्याचे तीन पांयी लोखंडी तिपाई) ठेवून तिनें त्यावर ताट ठेवला आणि त्यांत प्रथम विषमिश्रित अन्न आणून वाढिलें. त्यावेळीं
एकाएकी तो बाट घसरून खाली पडला. त्यामुळे साहजिकच त्यामध्यें वाढलेले अन्न भूमीवर पडले. हे पाहून रांजाच्या मनांत असे का झालें ! म्हणून शंका आली. त्यांनी ते अन्न निरीक्षून पाहिले, आणि वैद्यराजास व मंत्री वगैरे जनांस बोलावून आणविलें. अन्नाचे चांगले परीक्षण कर विलें. शेवटी त्यांत विषमिश्रण केले आहे, असे कळून आले. सूक्ष्म- रीतीनें चौकसी केली. तेव्हां असे निश्चित झालें कीं; सुममा राणीने अन्नांत विषमिश्रण करविलें आहे. तेव्हां राजानें व त्यांच्या प्रधान मंडळीनीं तिची पुष्कळ अवहेलना व अपमान केला. मग तिच्या मांत अत्यंत पश्चात्ताप होऊन आपली निंदा आपण करून घेऊं लागली.
मनोहरा राणीच्या व्रताच्या व धर्माच्या प्रभावानें राजावरचे विष- प्रयोगाचे हैं संकट दूर झालें, असें सर्वांस समजून आल्यामुळे मोठें आश्चर्य वाटलें. आणि मनोहरा रार्णाच्या प्रसादानें आपण वांचलों, असे जाणूनच त्या सुप्रभा राणीनेंहि हें व्रत स्वीकारिलें. तसेंच राजा, अष्टमंत्री वगैरे त्या व्रताच्या प्रभावाला लुब्ध होऊन हे व्रत घेऊन पाळू लागले.
त्यानंतर राजा सर्व दलभारासह दिग्विजय करण्यासाठीं मोठ्या थाटानें बाहेर पडला. थोड्याच अवधींत सर्व पृथ्वी साध्य करून सैन्या- सह आपल्या नगरी मोठ्या उत्साहानें परत आला. मग त्यानें त्या मनोहरा राणीस पट्टराणी करून तिचा थोर सन्मान केला. या व्रताचें उद्यापन शेवटीं इच्याकडून मोठ्या ऐश्वर्यानें करविलें. नंतर पुष्कळ काल-
पर्यंत ते सुखानें राज्यैश्वर्याचे उपभोग घेऊ लागले.
अंतकाळीं त्यांच्या मनांत या क्षणिक संसाराविषयीं वैराग्य उत्पन्न झाल्यामुळे ती दंपति जिनदीक्षा घेऊन तपश्चरण करूं लागली. तप प्रभावानें ती स्वर्गास गेली व पुढें क्रमानें मोक्षास जातील.