व्रतविधि – आषाढ शु. २ ते ६ पर्यंत पांच दिवस या व्रति- कांनीं प्रभातीं शुचिजलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीतवस्ने धारण करावीत. सर्व पूजासामग्री बरोबर घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीने साष्टांग प्रणिपात करावा. पीठावर पंचपरमेष्ठी प्रतिमा स्थापून तिला पंचामृतांनी अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुत व गणधर पूजा करून यक्ष, यक्षी व नम्हदेव यांचे अर्चन करावे. पंचमकारचे चरु करावेत. नंदादीप लावावा. ॐ ह्रीं अर्हत्सिद्धाचार्योयाध्यायसर्वसाधुभ्यो नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुष्पें घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. एका पात्रांत पांच पार्ने ठेवून त्यांवर अष्टद्रव्ये नारळ लावून महार्घ्य करून त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. सत्पात्रांस आहारादि दाने द्यावीत. यथाशक्ति उपवासादिक ब्रम्हचर्यपूर्वक करून धर्मध्यानांत काल घालवावा. याप्रमाणे पांच दिवस पूजाक्रम करून उद्यापन करणे जघन्य, पांच महिने मध्यम, पांच वर्षे उत्तम. असे तीन प्रकार होतात. कोणत्याहि प्रकाराच्या अंतीं पंचपरमेष्ठीविधान करून महाभिषेक करावा, चतुःसंघास चतुर्विध दाने द्यावीत. असा याचा पूर्णविधि आहे.
कथा-पूर्वी हे व्रत मेरुमंधर राजाने केलें होतें. त्यायोगानें त्याला गणधर पदवी प्राप्त झाली. असा दृष्टांत आहे. श्रेणिक महाराजा व चलना महादेवी यांचीच कथा येथे घ्यावी.