व्रतविधि-वैशाख शु. ७ दिनीं या व्रत धारकांनी एकमुक्ति करावी. आणि ८ दिवशीं प्रातःकाळी शुचिजलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढघौत वस्ने धारण करावींत. सर्व पूजाद्रव्ये हाती घेऊन जिनालयास जाने. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमन करावे. पीठावर सुपार्श्वनाथ तीर्थकर प्रतिमा नंदिविजय यक्ष काली यक्षीसह स्थापून तिला पंचामृतांनी अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे, ॐ ह्रीं श्रीं क्लीं अर्हं सुपार्श्वनाथतीर्थकराय नंदिविजययक्षकालीयक्षी- सहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्रानें १०८ पुष्पैं घालावींत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. एका पात्रांत सात पार्ने लावून त्यांवर अष्टद्रव्यें व एक नारळ ठेवून महार्घ्य करावें.
त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून घालून मंगलारती करावी. सत्पात्रांस आहारदान द्यावें. ब्रम्हचर्यपूर्वक उपवास करून धर्मध्यानांत काल घालवावा. दुसरे दिवशीं पूजा व दान करून आपण पारणे करावे.
याममाणे सहा महिने पूर्ण झाल्यावर कार्तिक आष्टान्हिकपत्रांत याचे उद्यापन कराने, त्यावेळीं सुपार्श्वनाथ तीर्थंकरविधान करून महाभिषेक करावा. चतुःसंघास चतुर्विषदाने द्यावीत. असा याचा पूर्णविधि आहे.
– कथा –
पूर्वी कीर्तिधर नामक एका राजानें मोठ्या उत्सवानें हा पूजाक्रम केला होता. त्यावरून या व्रतास हे नांव पडले आहे. हे व्रत पाळून पुष्कळ कालपर्यंत ऐहिक सुख अनुभवून त्यानें शेवटी जिनदीक्षा घेतली. घोरतपश्चरण केले. त्यामुळे तो स्वर्ग व क्रमानें मोक्षसुख भोगूं लागला. श्रेणिक राजा व चलना राणी यांचीच कथा येथे घ्यावी.