व्रतविधि – माघ शु. १४ दिवशीं या व्रतिकांनी एकमुक्ति करात्री. १५ दिवशीं प्रातःकाळीं सुखोष्ण जलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्त्र धारण करावीत. सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग प्रणिपात करावा. नंदादीप लावावा. पीठावर पद्मप्रभ तीर्थकर प्रतिमा कुसुमवर यक्ष व मनोवेगा यक्षीसह स्थापून त्यांचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. देवापुढे एका पाटावर सहा स्वस्तिके काढून त्यांवर पार्ने, अक्षता, फुलें, फले वगैरे ठेवावे. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुत व गणधर यांची पूजा ९रून यक्ष. यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे. पंचम क्ष्यांचे चरु करावेत. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं पद्मप्रमतीर्थंकराय कुसुमवरयक्ष मनोवेगायक्षीसहिताय नमः स्वाहा ।। या मंत्राने १०८ पुष्ये घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. जिनसद्दस- नामस्तोत्र म्हणून ही व्रतकथा वाचावी. एका पात्रांत क्रमाने सहा पाने लावून त्यांवर अष्टद्रव्ये आणि एक नारळ ठेवून महार्घ्य करून त्यांने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती कराची, त्या दिवशी उपवास करावा. ब्रम्हचर्यपूर्वक धर्मध्यानांत काल घालवावा. सलात्रांस आदारादि दाने द्यावीत. दुसरे दिवशीं पूजा व दान करून आपण पारणे करावे.
याप्रमाणे हे व्रतपूजन महिन्यांतून एक्दां पौर्णिमेस करावे. असे सहा पोर्णिमेस पूजाक्रम पूर्ण झाल्यावर याचे उद्यापन करावे. त्यावेळीं पद्मपम तीर्थकर विधान करून महाभिषेक करावा. सहा मुनि, आर्थिका, आवक, श्राविका, यांना आहारदान देऊन आवश्यक वस्तू द्याव्यात. असा याचा पूर्णविधि आहे.
– कथा-
हे व्रत पूर्वी सूर्यप्रभ राजाने यथाविधि पाळले होते. त्यायोगार्ने तो संसारांतील सर्व सुखें मोगून अंतीं जिनदीक्षा घेऊन घोरतपश्चर्या करून सल्लेखना घेऊन ज्योतिर्लोकांत महर्द्धिक देव झाला. पुढें क्रमाने जो मोक्षास गेला. असा याचा दृष्टांत आहे. श्रेणिकराजा व चेलनाराणो यांचीच कथा येथे घ्यावी.