व्रतविधि-श्रावण शु. १४ दिवशीं या व्रतिकांनीं एकमुक्ति करावी. १५ दिवशीं प्रातःकाळी शुचि जलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौतवस्ने धारण करावींत. सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्थापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. पीठावर चंद्रमभ तीर्थकर प्रतिभा श्याम यक्ष व आलामालिनी यक्षीसह स्थापून तिचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं चंद्रप्रभ तीर्थंकराय श्यामयक्ष-ज्वालामालिनी यक्षीसहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ सुगंधी पुष्पें घाला- वीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. देवापुढे एका पाटावर सहा स्वस्तिके काढून त्यांवर पार्ने, अक्षता, फुले, फलें वगैरे लावून एकेक अर्थ द्यावे. नैवचे दाखवावीत. ही व्रतकथा वाचावी. एका पात्रांत सहा पार्ने लावून त्यांवर अष्टद्रव्ये व एक नारळ ठेवून महार्घ्य करावे, त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्या दिवशीं उपवास करावा. अथवा सहा वस्तूंनी एकसुक्ति करावी. सत्पात्रांत आहारदान द्यावे. ब्रह्मचर्यपूर्वक धर्मध्या- नांत काल घालवावा.
या प्रमाणे हे व्रत सहा पौर्णिमेपर्यंत करून शेवटीं याचे उद्यापन करावे. त्यावेळीं चंद्रममतीर्थकर विधान करून महाभिषेक करावा. चतुःसंघास चतुर्विध दाने द्यावीत. आणि आवश्यक वस्तूंहि द्याव्यात. असा याचा पूर्णविधि आहे.
– कथा –
हे व्रत चंद्रशेखर नामक एका गुणवान्, नीतिमान् अशा राजानें पाळले होते. त्यायोगें तो पुष्कळ ऐहिक सुखाचा अनुभव घेतला. शेवटीं त्याने वैराग्यमावानें जिनदीक्षा घेऊन घोर तपश्चर्या केली. अंत समयीं चंद्रविमान पाहून निदान बांधल्याने तो चंद्र होऊन जन्मला. असा याचा दृष्टांत आहे. श्रेणिक महाराजा व चलना राणी यांचीच कथा येथे घ्यावी.