व्रतविधि-आषाढ शु. ४ दिवशीं या ब्रतिकांनी एकभुक्ति करावी. आणि ५ दिवशीं प्रभातीं शुचिजलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्त्र धारण करावीत. सर्वपूजासाहित्य हातीं घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास मक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. पीठावर पंचपरमेष्ठी प्रतिमा स्थापून तिला पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुत व गणधर यांचो पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रह्मदेव यांचे अर्चन करावें, देवापुढे पांच पार्ने क्रमाने मांडून त्यांवर अक्षता, फलें, फुड़े वगैरे ठेवून अर्चना करण्यास प्रारंभ करावा. ॐ हां नहीं हं हौं व्हः अर्हसिद्धाचार्योपाध्यायसर्वेसाधुभ्यो नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुष्पे घालावीत. ही व्रतकथा वाचावी. नंतर एका पात्रांत पांच पार्ने लावून त्यांवर अष्टद्रव्ये व एक नारळ ठेऊन महार्घ्य करावें. त्याने ओवाळीत मंदिरास तोन प्रदक्षिणा घालून मंगलारत्तो करावी. त्यादिवशीं उपवास करावा, सत्पात्रांस आहारदान द्यावे. ब्रह्म- चर्यपूर्वक धर्मध्यानांत काल घालवावा. दुसरे दिवशीं पूजा व दान करून आपण पारणें करावें. उपवास करण्याची शक्ति नसल्यात पांच वस्तूंनी एकाशन करावें. द्रव्य, क्षेत्र, काल, भाव व भव या पांच प्रकारच्या संसाराचे निवारण होण्यासाठीं णमोकार मंत्राने पांच जप करावेत. याप्रमाणे प्रत्येक मासीं शु. ५ दिनीं पूर्ववत् पूजाक्रम करावा, अशा रीतीनें कार्तिक शु. ५ दिवशीं याचे उद्यापन करावें. त्यावेळीं पंचपरमेष्ठीविधान करून महाभि- षेक करावा, पांच मुनींना आहारदान देऊन पांच शाने, श्रुतवस्त्रे, जयमाला अर्पण कराव्यात. तसेच आर्थिका, श्रावक, श्रऑविका यांनाहि दान द्यावे. असा याचा पूर्णविधि आहे.
कथा-
है व्रत पूर्वी पंडु राजा आणि त्यांच्या धर्मपत्नी कुंती व नाद्री यांनी केले होते. त्यामुळे त्यांना पराक्रमी, गुणशाली असे पांच पुत्र झाले. अनेक प्रकारे संसारसुख मिळून शेवटी त्यांनीं जिनदीक्षा घेतली. उत्तम रीतीनें तपश्वरण करून समाधिविधीनें मरून ते स्वर्गात गेले आहेत. असा दृष्टांत आहे. श्रेणिक राजा व चलना राणी यांचीच कथा येथे घ्यावी.