व्रतविधि – आषाढ शु. ७ दिवशीं या ब्रतिकांनीं एकभुक्ति करावी. व ८ दिवशीं प्रभातीं शुचिज्जलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीतवस्ने धारण करावीत. सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास मक्तीने साष्टांग नमस्कार करावा. पीठावर शांतिनाथ तीर्थकर प्रतिमा गरुडयक्ष महामानसी यक्षीसह आणि नंदीश्वर बिंब स्थापून त्यांचा पंचामृतांनीं अभिषेक करात्रा. देवापुढे एका पाटावर सोळा स्वस्तिकें काढून त्यांवर पार्ने, फुले, फलें, अक्षता वगैरे ठेवून क्रमानें अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुत व गणधर पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं शांतिनाथतीर्थंकराय गरुडयक्ष महामानसी यक्षीसहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुष्पें घालावींत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. एका पात्रांत सोळा पार्ने लावून त्यांवर अष्टद्रव्ये व एक नारळ ठेवून महार्घ्य करावें. त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्यादिवशी उपवास करावा. शक्ति नसल्यास एका- शन करावें, ब्रम्हचर्यपूर्वक धर्मध्यानांत काल घालवावा. दुसरे दिवशी पूजा व दान करून आपण पारणें करावें.
याप्रमाणे सोळा अष्टमीच्या पूजा करून फाल्गुन अष्टान्द्रिकांत याचे उद्यापन करावे. त्यावेळी शांतिनाथविधान करून महाभिषेक करावा. चतुःसंघास चतुर्विध दार्ने द्यावीत. असा याचा पूर्णविधि आहे.
– कथा –
पूर्वी वज्रनंध महाराज आणि त्यांची पट्टराणी श्रीमती यांनी हे बत केले होते. एका सरोवराच्या काठीं चारण मुनीश्वरांना आहारदान दिले होने. त्या पुण्योदयाने ते भोगभूमींत जन्मून तेथील पुष्कळ इए सुम्बाचा अनुभव घेऊन स्वर्गात महर्द्धिक देव झाले. तेथे पुष्कळ फाऊ सुख भोगून ते पुनः या लोर्की येऊन चक्रवर्ति झाले. तेथे ते वैभव भोगून त्यांनीं शेवटीं जिनदीक्षा घेतली. घोरतपश्चर्या करून त्यांनो सोळा भावना भाविल्या. इत्यादि कारणाने त्यांना तीर्थकर नामकर्म प्रकृतीचा बंध पडला. मग ते पुढें आदिनाथ तीर्थकर झाले. व श्रीमतो ही आर्यिका होऊन पुष्कळ काळ तप करून स्त्रीडिंग छेडून स्वगांत महर्द्धिक देव झाली. तेथे तो पुष्कळ काळ सुख भोगून तेथून च्ववून या लोकीं दानशूर श्रीमान् श्रेयांस राजा झाला. राज्यैश्वर्याचा मोग घेऊन वैराग्य भावना त्यांच्या मनांत उत्पन्न झाल्यामुळे त्याने वृषमनाथ तीर्थकरांच्या समवसरणांत जिनदीक्षा घेतली. तेव्हां तत्काल तेथे त्याला गणधर पदवी प्राप्त झाली. पुढे त्या आदिनाथ भगवंतांना व या गणधरांना शुक्लध्यानाच्या बलानें सर्वकर्षांचा क्षय होऊन मोक्षपद मिळालें. सारांश षोडशक्रिया व्रतमभावाने त्यांना क्रमानें मुक्तिपत्र प्राप्त झाले. असा या व्रताचा दृष्टांत आहे. श्रेणिक राजा आणि चलना राणी यांची कथा येथे घ्यावी.