व्रतविधि – आषाढ शु. ५ दिवशों या व्रतिक्रांनों एकभुक्ति करावी. ६ दिवशी प्रातःकाळों शुविज्ञकार्ने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीत वर्षे धारण करावीत. सर्व पूजासामग्री हाती घेऊन जिनाल यास जावे. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्वापयशुद्धि- पूर्वक जिनेंद्रास भक्तीने साष्टांग नमस्कार करावा. पीठावर पद्मप्रभ तोर्वेकर प्रतिमा कुसुपवरयक्ष मनोवेगा यक्षोसइ स्थापून तिला पंचा- मृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावो. श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं पद्मप्रभ तीर्थकराय कुसुमवरयक्ष मनो- वेगायक्षीसहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्रानें १०८ पुष्पे घालावीत. देवापुढे एका पाटावर सहा पार्ने क्रमाने मांडून त्यांवर अक्षता, फळे फुले बगैरे ठेवून पुढील श्लोक म्हणावा.
देवपूजा गुरुपास्तिः । स्वाध्यायः संयमस्तपः ॥
दानं चेति गृहस्थानां । षट्कर्माणि दिने दिने ॥ १ ॥
नंतर णमोकार मंत्राचा जप सहा वेळां करावा. ही व्रतकथा वाचावी. नंतर एका पात्रांत सहा पार्ने मांडून त्यावर अष्टद्रव्ये व १ नारळ ठेवून महाध्ये करावें. त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा बालून मंगलारती करावी. त्या दिवशीं उपवास करावा, ब्रम्हचर्य पूर्वक धर्मध्यानांत काल घालवावा. सत्पात्रांत आहारदान द्यावे. दुसरे दिवशीं दान पूजा करून आपण पारणें करावें. अथवा सहा वस्तूंनीं एकाशन करावें.
याप्रमाणें चार महिने है व्रत करून कार्तिक आष्टान्हिकांत याचे उद्यापन करावें. त्यावेळीं पद्मप्रभ तीर्थकर विधान करून महाभिषेक करावा. सहा मुनि संवास आहारदान द्यावे. सहा शास्त्र, श्रुतवों, जयमाला वगैरे आवश्यक वस्तू द्याव्यात. असा याचा पूर्णविधि आहे.
– कथा –
पूर्वी पद्मनंदी नामें एका राजाने है व्रत विधिपूर्वक पाळले होते. त्या योगें त्यांत अनेक पुत्रमित्रकलत्रांसह संसारसुखाचा अनुभव मिळाला. शेवटी वैराग्य भावनेने त्याने जिनदीक्षा घऊन कठिण तपश्चर्या केली. क्रभाने त्याला स्वर्ग अपवर्ग सुख प्राप्त झाले. असा दृष्टांत आहे. श्रेणिक महाराज व चलना महाराणी यांचीच कथा येथे घ्यावी.