व्रतविधि – आश्विन शु. ५ दिवशीं या व्रतधारकांनी प्रासुक- पाण्याने अभ्यंगस्नान करून अंगावर नूतन घौत बखें धारण करावीत. मग सर्व पूजा साहित्य घेऊन चैत्यालयास जावें. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धी बगैरे क्रिया कराव्यात. श्रीजिनेंद्रास भक्तीनें साष्टांग प्रणिपात करावा. मंडप शृंगारून चंद्रो- पक बांवावें. शुद्धभूमी करून त्यावर पंचवर्णानीं अष्टदल यंत्र काढून त्याच्या सभोवती चतुरस्त्र पंचमंडले काढावीत. त्याच्या मोवतीं अष्ट मंगल कुंभ आणि आठ (प्रातिहार्ये) मंगलद्रव्ये ठेवावीत. मध्ये एक सुशोभित कुंभ ठेवावा आणि एका ताटांत पांच पार्ने, गंधाक्षता, फळे, फुले बगैरे ठेवून तो ताट त्यावर ठेवावा. श्रीर्पाठावर पंचपरमेष्ठी प्रतिमा यक्ष-यक्षीसह स्थापून त्यांचा पंचामृतांनी मंत्रपूर्वक अभिषेक करावा. देवापुढे एका पाटावर पांच स्वस्तिकें काढून त्यांवर पोच पाने, गंधाक्षता, फळे, पुष्पें वगैरे द्रव्ये ठेवावीत. मग पंचपरमेष्ठीची प्रतिमा त्यामध्य- कुंभावरील ताटांत स्थापावी. आणि अष्टद्रव्यांनी त्यांची पूजा करावी. श्रुत व गुरु यांची अर्चना करावी. मग यक्ष, यक्षी, ब्रह्मदेव यांचें ही अर्चन करावें. पंचपक्वान्नांचीं पांच नैवेद्ये करावीत. आणि ॐ नहीं अई अनंतचतुष्टकात्मकेभ्यो नवकेवललब्धिसमन्वितेभ्यो अर्हत्पर- मेष्ठिभ्यो नमः स्वाहा ॥ १ ॥ ॐ हीं अई अष्टकर्मविनिर्मुक्तेभ्यो अष्टगुणसंयुक्तेभ्यः सिद्धपरमेष्ठिभ्यो नमः स्वाहा ॥ २ ॥ ॐ हीं अई पंचेंद्रिविषयरहितेभ्यः पंचाचारनिरतेभ्यः सूरिपरमेष्ठिभ्यो नमः स्वाहा ॥३॥ ॐ न्हीं अई व्रतसमिविगुप्तिसहितेभ्यः कषाय- दुरिवरहितेभ्यः पाठकपरमेष्ठिभ्यो नमः स्वाहा ॥४॥ ॐ न्हीं अर्ह मूळोत्तरगुणाढ्येभ्यः सर्वसाधुपरमेष्ठिभ्यो नमः स्वाहा ॥ ५ ॥
या पांच मंत्रातून प्रत्येक मंत्रानें एकेक अर्घ्य देऊन १०८-१०८ बेळां सुगंधि पुष्पें घालावींत. याच क्रमानें चार वेळां पूजा करावी. नंतर एका पात्रांत पांच पानें व त्यावर अष्टद्रव्यें व एक नारळहि ठेवून ॐ हां हीं हूं हों छः असिआउसा पंचपरमेष्ठिभ्यो नमः स्वाहा।। या मंत्राने पूर्णार्ध्य करावें. श्रीजिनसहस्रनामस्तोत्र म्हणून ही व्रतकथा वाचावी. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. मग पूर्ववत् एक महार्घ्य करून त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगळा- रती करावी. त्यादिवशीं उपवास करावा. सर्व दिवस धर्मध्यानांत घालून ब्रम्हचर्य पाळावे. प्रातःकाळीं जिनपूजा करून नऊ वेळवाच्या करंड्यांत नारळ, फळे, फुले, गंधाक्षता, करंज्या वगैरे घालून वायनें बांधावींत. त्यांतून एक देवापुढें, एक पंचपरमेष्ठिपुढें, एक सरस्वतीपुढे, एक गुरुपुढें, एक यक्षी पुढे, अशीं ठेवून आपण एक ध्यावें नंतर बाकीची उत्तम सम्यग्दृष्टी श्रावक, श्राविकांना द्यावीत. पायस व कलपोगरं (पकान्ने) यांचे नऊ चरु करून देवांना अर्पण करावेत. मुनि, आर्थिका, उपाध्याय, श्रावक, श्राविका यांनां आहारादिदानें देऊन आपण पारणा करावी. याप्रमाणें हें व्रत् पांचवर्षे करून नंतर त्याचे उद्यापन करावें. त्यावेळी श्रीपंचपरमेष्ठिची नूतन प्रतिमा करवून पंचकल्याणविधिपूर्वक तिच। प्रतिष्ठा करावी. नवीन नऊ पात्रांत व नऊ वाठ्यांत पायस, अंबील, करंज्या, लाडू वगैरे पकानें घालून वायनें तयार करून द्यावींत. वायनो देवांपुढे ठेवतांना मंत्र म्हणावा – ॐ न्हीं अई नमोईते पंचकल्याण- संपूर्णाय नवकेवललब्धिसमन्विताय स्वाहा ।। या मंत्रानें वायनें देवापुढें ठेवावींत. आणि ॐ नमोईते भगवते सर्वकर्मनिर्जरां कुरु कुरु स्वाहा ।। यामंत्रानें वायनें धाबींत. चतुःसंघास आहारादि दानें धावीत. असा या व्रताचा पूर्ण विधि आहे. आतां हे व्रत पालन केल्या- मुळे पूर्वी ज्यांना उत्तम फळ प्राप्त झालें आहे; त्यांची कथा तुम्हांस सविस्तर सांगतों एकाग्रमनानें ऐका –
उज्जयिनी नगखसमीप एक लहानसें खेडे होते. तेथे पूर्वी बलभद्र लायें एक पाठील होता ज्याला सात मोठे पुत्र होते. त्यांना सात, आर्या होत्या. तो यांच्यासह सुझा नांदत असतां, एकेदिवशी एक महातपस्वी त्यागांवाच्या कोठासन्निध कायोत्सर्ग, प्ररून ध्यान करीत राहिले होते. लस पाटलांची यशोमति या नांवाची एक प्राकृट्टी सून होती तिनें अंधुक प्रभातीं, जनावराचे शेण गोळा करून कोदा बाहेर नेवून ढाक़िले. त्यावेळी ते शेण त्या मुनीश्वरावर पड़लें? दिक्स उजाडला. लोक, इतस्ततः (इकडे तिकडे) संचारूं लागले. बलभद्र पाटील बहिर्दिशीं येले होते. तेव्हां त्या मुनीश्वरांच्या आंगावर शेप्स पडलेले दिसून आलें. मग त्यांनी उष्पाजल घरांतून ‘आणवून त्यांनें त्यांचे शरीर धुवून पुसून, चांगलें स्वच्छ केलें. नंतर मुबीनीं ध्यानाचें विसर्जन केलें. मग पाटलानें त्यांना सक्तीनें नमस्कार केला. आणि विनयात्र म्हटलें, हे मुनिराज 1. आमच्या प्राकका सुतेजें अज्ञानप्रणामुळे ह जाणतां आपल्या शरीरावर शेण टाकिलें आहे. त्याबद्दल आम्हांत्रर आपण क्षमा करावी. तेव्हां मुनी म्हणाले, हे भद्रपुरुषा ! यांत तुमच्याकडे कांहीं दोष नाहीं. आमचाच पूर्वभवीचा कर्मोदय आहे. अप्ते म्हणून ते मुनिराज त्याला ‘सद्धर्मवृद्धिरस्तु ‘ असा आशिर्वाद देऊन तेथून वनांत निघून गेले.
इकडे ती यशोमति स्त्री त्या मुनीश्वरांच्या अंगावर शेण टार्कीटेल्को पातकामुळे दुर्धर रोगानें ग्रस्त होऊन मरण पावली. ही उज्जया वैश्यसुताच्या घरी जन्मली. जन्मतांच तिचे आईबापं वगैरे वारले. मग एका गृहस्थानें तिचे पालन पोषण केलें. ती पांच वर्षाची होतांच तो पाल- कही मरण पावला. नंतर श्रीमति नामें एक भाविक आर्यिका तिचें पालन पोषण करूं लागली. लोक तिला, ‘कर्मी’ म्हणून संबोधित असत.
पुढे एकेदिवशी त्या जांयांतील जिनमंदिरांत श्रुतसागर नामक महाऋद्धिधारी चारण मुनीश्वरे आले होते, त्यांच्या दर्शनार्थ नगरांतील श्रावक श्राविका गेल्या. त्यावेळीं ती कर्मी कुमारीहि तेथे गेली होती, सर्वजन त्या मुनींना तीन प्रदक्षिणा घालून भक्तीने दर्शनादि करून त्यांच्या समीप जाऊन बसले. त्यावेळी त्यांनी आपल्या मधुर वचनांनी सर्वाना धर्मोपदेश केला, तो ऐकून ती कर्मी कुमारी अत्यंत दुःखाकुछ होऊन आपल्या नेत्रांतून अश्नु ढाळीत त्यांच्या चरणावर पडली, तेव्हां दस सुन्नींनी आपल्या अवधिज्ञानानें तिचा पूर्वीचा सर्व भवप्रपंच जाणून अत्यंत दयाळु अंतःकरणानें म्हटलें, हे कन्यके ! तूं आपल्या पूर्व अवांत एका महातपस्वींच्या अंगावर अज्ञानपणामुळे शेण टाकली होतीस त्या पातकांमुळे आतां तुला ही दुःखद दारियावस्था प्राप्त झाली आहे. आणि-त्या ‘दुर्दैवामुळेच तुझे मातापिता व पालनकर्ता हेहि मरण पावले आहेत. आतां तूं त्या कर्माच्या निर्जरेसाठीं ‘कर्मनिर्जराव्रत ‘ यथाविधी पाळून त्याचें उद्यापन कर. म्हणजे त्या योगानें पुढे तुला ऐहिक आपित पारमार्थिक सुख मिळेल. असे म्हणून त्यांनीं त्या व्रताचा विश्वी सांगितला. मग त्या कर्मी कुमारीनें तें व्रत त्यांच्या जवळ ग्रहण केलें. नंतर ते मुनीश्वर तेथून निघून गेले….
त्यानंतर कर्मी कुमारीनें तेथील श्ववक श्राविका यांच्या साहायानें कालानुसार हें व्रत करण्यास प्रारंभिलें. पुढें कांहीं दिवसांनीं त्या उज्जयनी नगरींचा राजपुत्र श्रियंकर सर्पदंश होऊन अकस्मात् मरण पावला. पण त्यावेळी त्याचा विवाह झाला नव्हता. त्यामुळे त्याच्या मातेस अत्यंत दुःख झालें. ती आपल्या पतीस म्हणते, हे प्राणनाथ ! आमच्या मुलाचा विवाहसंस्कार केल्याशिवाय दहनक्रिया करूं नका, हें राणीचे वचन ऐकून, – राजा प्रधानांस म्हणतो,- हे प्रधानांनो ! आतां आमच्या मुलाचा विवाहसंस्कार केल्यावांचून त्याचें दहन करावयाचे नाहीं. त्या करितां कन्या मिळवून आणण्याचा कांहीं तरी उपाय तुम्ही सत्वर करा.
तेव्हां मृत झालेल्या पुत्रास कन्या कोण देणार ! म्हणून ते सर्व चिंता- क्रांत झाले. मग मंत्रीजनांनीं एक युक्ति योजून पुष्कळ सुवर्णादि धन एका गाडींत भरून नगरांतून असा डांगोरा पिटविला कीं; आमच्या या मृत झालेल्या राजपुत्रास जो आपली कन्या देईल त्याला हे सर्व धन देऊ. ज्यांची इच्छा असेल त्यांनीं संतोषानें आपली कन्या धावी आणि हूँ सर्व धन घ्यावें’ असा उच्चस्वरांत घोष करीत करीत त्या धनपूर्ण- गाडीसह ते राजसेवक त्या जिनमंदिराजवळ आले. तेव्हां ती कर्मी कुमारी त्या श्रीमति नामें आर्थिकाबाईस म्हणते, हे आर्यात्रिके ! आतां मी हें आपले शरीर त्या मृत राजकुमारास विकून ते सर्व धन जर घेतलें, तर त्या योगानें जिनपूजादि कर्म करून पुण्यलाभ करून घेतां येईल कीं नाहीं ? हे त्या कन्येचें चातुर्याचे व धूर्तपणाचे भाषण ऐकून ती आर्यिका तिला म्हणते, हे कुमारी ! तुझ्या मनांत तसे धैर्य व उत्साह जर असेल ते द्रव्य घेण्यास कांहीं. हरकत नाहीं हे आर्थिकेचे वाक्य ऐकतांच ती कन्या धावत त्या राजसेवकांकडे गेली, आणि त्यांना म्हणाली, – हे राजसेवक हो ! ‘ मी त्या मृत राजकुमाराशीं विवाह करून घेण्यास तयार आहे’ तेव्हां हे गाडीतील सर्व धन उतरून आमच्या मातेच्या स्वाधीन करा. म्हणजे तत्काळ तुमच्या बरोबर याच गाडींतून येते. चला. असें ती म्हणतांच त्या राजसेवकांनीं ते सर्व द्रव्य गाडींतून उतरून त्या आर्यिका बांईच्या स्वाधीन केले आणि त्या कन्येला गाडींत बसवून राजवाड्याकडे मोठ्या थाटानें नेलें. तेव्हां राजा, राणी, मंत्री वगैरे सर्वजनांस मोठें आश्चर्य वाटलें. मग त्यांनीं त्याचक्षणीं एक सुंदर मंडप उभारून मोठ्या समारंभानें त्या राजकुमाराचे त्या कर्मी कन्येशीं लग्न केलें.
त्यानंतर त्या मृत राजकुमाराची प्रेतयात्रा निघाली. ती वेशीजवळ पाँचत न पोंचते तोंच मेघकुमारानें अकस्मात् भयंकर असा मेघ वर्षाव सुरू केला. त्या वेशी सन्निधच एक मोठा ओढा होता. तोही एकदम
भरून येऊन मोठ्या वेगाने वाहूं लागला. अशा भीषण परिस्थितीत सर्वानी विचार करून ते प्रेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवून त्याच्या रक्षणाकरितां किंकराची योजना केली. आणि ते सर्वजन राजवाड्याकडे निघून गेले. मात्र ती कर्मी युवराज्ञी आपल्या पतीच्या सेवेस तेथेंच राहिली. तो दिवस तिच्या ‘कर्मनिर्जरा’ व्रताचा असल्यानें तिला स्मरण झालें. मग तिनें त्या ओढ्याच्या समीप जाऊन मंत्रानें आपले अंतरंग शुद्ध करून पंचपरमेष्ठींच्या मंत्रानें केवळ पाणी व वालुका (मळल तेगेदुकोंडु) यांनी भावपूजा मोठ्या भक्तीने आरंभिली. तेव्हां ही तिची दृढ भक्ती पाहून पद्मावतीदेवीचें आसन कंपायमान झालें. मग ती आपल्या अवधिज्ञानाने त्या भाविक कन्येची सर्व परिस्थितीजाणून तत्काळ तेथे आली, आणि ती आपलें दिव्यरूप प्रकट करून म्हणाली, – हे दीन बालिके ! पूजा द्रव्यें नसतां तूं हैं मिथ्यापूजा कां आरंभिली आहेस ? (मळलदिंद माडिदरे) वाळू व पाणी यांच्यापासून पूजा केल्यानें तुला कांहींच फल प्राप्ति होणार नाहीं. हे तिचे भाषण ऐकून, ती कन्या म्हणते, हे भगवती ! आपण कोण आहात ? कोठून व कां आलात ? असे विचारतांच ती पद्मावतीदेवी म्हणते, – हे कन्ये ! तू मला भिऊ नकोस. मी पद्मावतीदेवी आहे. पंचपरमेष्ठी वरील केवळ तुझा दृढभाव जाणून मी येथे आले आहे. आतां मी तुला प्रसन्न झालों आहे. माझ्याजवळ तुला जो बर’ मागावयाचा असेल तर तो माग. मग ती कर्मी म्हणते, हे महादेवि ! मी राजाच्या प्रकट आज्ञेप्रमाणें द्रव्यलोभानें त्याच्या मृतपुत्राशीं विवाह करून घेतला आहे. तो राजपुत्र आजच सकाळी सर्पदंशानें मृत्यु पावला होता, त्याचे प्रेत स्मशानांत दहन करण्यासाठीं येथे आणून ठेवले आहे आणि आजच माझ्या व्रतविधानाचा दिवसही आहे. त्यामुळे मी द्रव्याभावी येथें आतां भावपूजा करीत आहे. मग ती पद्मावती त्या कन्येसह तत्काळ त्या मृतराजपुत्राजवळ जाऊन त्याला निर्विष करून
आपल्या ठिकाणी निघून गेली. यावेळी गाढनिवेदन जगूत शाल्या प्रमाणे तो राजपुत्र एकदम उठून बरुला. तो भयचकित होऊन म्हणतो, हा काय प्रकार आहे? मला येथे कोणी व को आणिले । असे त्याच्या मुखांतून प्रतिष्वनि निघाले. हे ऐकून त्या कर्मी युवराहीले आपला प्रथमापासून इतिपर्यंत घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. हा सर्व चमत्कार पाहून तेथील रक्षकलोक राजाकडे धावत गेले आणि घडलेली सर्व हकिगत राजाला सांगते झाले.
हे ऐकून त्या सर्वांना अत्यंत आश्चर्य वाटले. तत्काळ पृषभसेन राजा, गुणसेना राणी, मंत्री वगैरे पुष्कळ लोक त्या राजपुत्राजवळ आले. तेव्हा त्या आपल्या प्रिय पुत्रास पाहतांच मोठा परमानंद शाळा. तसेंच इतर सर्व लोकांनाहि संतोष झाला. राजाने आपल्या त्या कर्मी स्नुषेला (सुनेला) पूर्ववृत्त विचारिलें. तेव्हां तिनें त्यांना घडलेला सर्व प्रकार यथास्थित सांगितला. तो ऐकून त्या ‘कर्मनिर्जरा’ प्रताविषर्थी व जैनधर्माविषयी सर्व लोकांच्या अंतःकरणांत अतिशय दृढ श्रद्ध। उत्पन्न झाली. सर्वजन ‘ ही महासती आहे.’ वगैरे रीतीने त्या कर्मीची प्रशंसा करूं लागले. नंतर सर्व जनांनीं त्या श्रियंकर राज- पुत्रास व त्या कर्मी युवराज्ञीस हत्तीवर बसवून सर्व लवाजम्यासह मोठ्या समारंभानें भिरवित राजमंदिरास आणिलें. मग तो वृषभसेन राजा सर्व परिवारासह सुखानें कालक्रमण करूं लागला.
पुढे कालांतरानें सर्वजन क्रमानें जिनदीक्षा घेऊन अंती समाधि- विधिनें मरण पावून अच्युत स्वर्गात देव झाले. आणि तेथे ते चिरकाळ पुष्कळ सुख अनुभवू लागले.