व्रतविधि – आषाढ शु. ७ दिवशीं या व्रतिक्रांनीं एकभुक्ति करावी. आणि ८ दिवशीं प्रभातीं शुचिजलानें अभ्यंगस्नान करून अंगा- वर दृढौत वस्ने धारण करावीत. सर्व पूजासाहित्य इातो घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक्क जिनेंद्रास भक्तोनें साष्टांग पणान करावा. पीठावर संभवनाथ तोर्थकर प्रतिमा त्रिमुख यक्ष व प्रज्ञप्ति यज्ञीसह स्थापून तिला पंचामृतांनीं अभि- बेक करावा. देवापुढे एका पाटावर तोन स्वस्तिकें काढून त्यांवर पार्ने, फुलें, फलें, अक्षता वगैरे ठेवून अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुत व गणधर यांचो पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे. चरु करावेत. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं संभवनाथ तीर्थंकराय त्रिसुखयक्ष-प्रज्ञप्तियक्षीसहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुष्पें घालावींत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. एका पात्रांत तीन पार्ने लावून त्यावर अष्टद्रव्ये एक नारळ ठेवून महार्घ्य करावे. त्यानें ओवाळोत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्या दिवशीं शक्तिप्रमाणें उपवास करावा. अथवा तोन वस्तूंनी एकाशन करावे. ब्रम्हचर्यपूर्वक धर्मध्यानांत काल घाऊबावा दुसरे दिवशीं पूजा व दान करून आरण पारणें करावें. याप्रमाणे नऊ अष्टमी व नऊ चतुर्दशीस पूजा करून कार्तिक आष्टान्डिकांत याचे उद्यापन करावे. त्यावेळीं संभवनाथ विधान करून महाभिषेक करावा. तीन मुनिसंघास आहारदान देऊन त्याना पुस्तके, श्रुतवले, जपमाळा, पिछो, कमंडलु इत्यादि आवश्यक वस्तु द्याव्यात. असा याचा पूर्ण विधि आहे.
– कथा –
नंदीपुर नांवाचे एक सुंदर नगर आहे. तेर्वे पूर्वी नंदिवर्धन नांवाचा एक पराक्रमो, नोतिमान् व गुणवान् असा राज्जा राज्य करत होता. त्याला नंदावतो नामें एक गुणशालिनी व रूपवती पट्टराणो होती. इच्यासह तो राजा राज्यैश्वर्याचा उपभोग घेत असतां, – एके दिवशीं त्याच्या नंदनवनांतील सहस्रकूट चैत्यालयाची वंदना करण्या साठीं एक नंदिघोष नांवाचे महादिव्यज्ञानी मुनीश्वर आपल्या तीनशे मुनिसंघासह तेथे येऊन उतरले. हे पाहून तेथील वनपालकाने राजपा- सादीं जाऊन ही शुभवार्ता राजास कळविली. तेव्हां तो तत्काल त्यांच्या दर्शनास तेथे गेला. मुनीश्वरांना भक्तीनें तीन प्रदक्षिणा घालून विनयाने वंदना करून तो त्यांच्या. समीप जाऊन बसला. कांही वेळ धर्मोपदेश ऐकल्यावर त्या रायाची विय धर्मपत्नि नंदावती ही मोठ्या भक्तीने आपले दोन्ही हात जोडून त्यांना म्हणालो, – हे महागुरुराज ! आम्हांस पुत्रसंतान नाहीं. त्यामुळे अत्यंत दुःख वाटत आहे. या करितां तें दुःख निवारण्यासाठीं एकदां उपाय सांगावा. हे तिचे नम्रवचन ऐकून ते तिला म्हणाले, – हे कन्ये ! तूं चिता व दुःख करूं नको. आतां तू नंदावती व्रत है पालन कर. म्हणजे तुझी सर्व चिंता व दुःख दूर होईल. तुला चरमशरीरी एक सत्पुत्र होईल. हे त्यांचे वचन ऐकून दिला अत्यंत आनंद झाला. मग तिने त्यांना वंदना करून हे व्रत ग्रहण
केले. नंतर महामुनीनीं तिला त्याचा सर्वविधि सांगितला. मग सर्वांनी त्यांना नमस्कार करून आपल्या नगरी परत आले. पुढे कालानुसार विनं हैं व्रत यथाविधि पाळिले. त्यायोगाने पुढे तिला. एक सुंदर पुत्र झाला. त्याचे नांत्र नंदिमित्र असे ठेवण्यांत आले. मग तो तरुणावस्थेत आल्यावर नंदिपेणा नामक एका राजकन्येशी याचा विवाह केला. पुढे तो नंदिमित्र व त्याची पियकांता नंदिषेणा हे दोघे अनेक पुत्रमित्रांसह सुखाने राज्योपभोग घेऊ लागले. शेवटीं तो राजा विरागी होऊन वनांत जाऊन एका गुरुजच्ळ जिनदीक्षा घेता झाला. तपोबलाने सर्व कर्मचा क्षय करून तो मोक्षास गेला.
नंदिवर्धन राजा व त्याची पत्नि नंदावती यांनी या व्रताच्या प्रभावाने व पुण्योदयामुळे स्वर्गादि संपत्ति मिळविली. असा या व्रताचा प्रभाव आहे.