व्रतविधि – आषाढ शु. ४ दिवशीं या व्रतिकांनीं एकमुक्ति करावी. ५ दिवशीं शुाचेजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत बजे धारण करावीत. सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि वगैरे क्रिया करव्यात. जिने- द्रास भक्तीने साष्टांग नमस्कार करावा. पीठावर पंचपरमेष्ठी प्रतिमा आणि पद्मप्रम तीर्थकर प्रतिमा कुनुमवर यक्ष मनोवेगा यक्षीसह स्थापून त्यांचा पंचामृताभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुत व गणधर यांचो पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें. देवापुढे एका पाटावर पांच पार्ने, अक्षता, फुले, फळे वगैरे ठेवून पंचभक्ष्य पायसांचे चरु करावेत, ॐ ह्रां ह्रीं ह्रूं ह्रौं ह्र:असिआउसा स्वाहा ।। बा मंत्राने १०८ पुष्ये घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. एका पात्रांत पांच पार्ने मांडून अष्टदब्बे व एक नारळ ठेवून महाध्ये करावे. त्याने ओवाळीत मंदिरास तीन पदक्षिणा घालून मंगळारती करावी, सत्पात्रांस आहारदान चाचे. त्यादिवशी उपवास करावा. नन्दचर्यपूर्वक भर्मध्यानांत फाल पाठवावा, दुसरे दिवशी पूजा व दान करून आपण पारणे करावें. अथवा पांच वस्तूंनी एकाशन करावे.
याप्रमाणे मदिभ्यांतून एकदां त्याच तिथीस पूजा करून शेवटी कार्तिक नंदीश्वर पवीत याचे उद्यापन करावे. त्यावेळी पंचपरमेष्ठी आणि पद्मनस सोधेकरविधान करून महाभिषेक करावा, चतुःसंघास चतुर्विध दाने यावीत, असा याचा पूर्णविधि आहे.
-कथा-
पूर्वी मगध देशांतील कनकपूर नगरांत देवकुमार या नांवाचा एक पराक्रमी, धार्मिक, गुणवान् असा राजा राज्य करीत होता. त्याला मित्रवती या नांवाची एक सुंदर, गुणवती पट्टराणी होती. हे सुखाने राज्यभोग भोगीत होते. या राजाचा पिता नागकुमार हा संसारापासून विरक्त होऊन जिनदीक्षा घेऊन गेला होता. त्याला तपःप्रभावाने केवलज्ञान प्राप्त झाले. तेव्हां चतुर्णिकाय देवांनीं येऊन गंधकुटीची रचना करून केवली पूजा केली. नंतर त्या गंधकुटींत केवलो भगवान् विराजमान होऊन छपन्न देशांतून लोकांना धर्मोपदेश करीत करीत एके दिवशीं-त्या कनकपुर नगराच्या उद्यानांत आले. ही वार्ता राजांस कळतांच देवकुमार राजा आपल्या परिवारजन आणि पुरजन यांसह त्यांच्या दर्शनास गेला. मुनींना तीन प्रदक्षिणा घालून त्यांची पूजा, वंदनादि करून आपल्या स्थलीं जाऊन बसला. त्यांच्या दिव्यवार्णीतून निघणान्या धर्मोपदेशास श्रवण केल्यावर राजाने विनयाने आपले करयुग जोडून भक्तीनें नमन करून त्यांच्या जवळ हे पंचसूना निवारण व्रत घेतले. नंतर सर्वजन नमस्कार करून नगरी परत आले. पुढे समयानुसार त्यानीं है बत यथाविधि पाळिले. त्यायोगाने त्यांना पुष्कळकाल अनेक भोगोपभोगांचा अनुभव मिळाला. पुढे विरक्त होऊन त्याने जिनदीक्षा घेतली. घोर तपश्चरण करून समाधिविधिने मरण पावून सर्वार्थसिद्धींत गेला. असा याचा दृष्टांत आहे.