व्रतविधिः- आषाढ शु. ७ दिवशों या व्रतिकांनों एकभुक्ति करावी. आणि अष्टमी दिवशीं प्रातःकाळीं शुचिजलाने अभ्यंगस्नान करून नंगावर दृढघौत वस्ने धारण करावीत. सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धि पूर्वक जिनेंद्रास मक्तीने साष्टांग प्रणिपात करावा. पीठावर शांतिनाथ तीर्थंंकर प्रतिमा गरुडयक्ष महामानसीयक्षीसह स्थापून तिला पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांचो अर्चना करावी. पंचमध्यपायसांचे चरु करावेत. श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रह्मदेव यांचे अर्चन करावें. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं शांतिनाथ तीर्थंकराय गरुडयक्ष-महामानसीयक्षीसहिताय नमः स्वाहा ॥ या मत्राने १०८ दुर्षे घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा ही व्रतकथा वाचावी. एका पात्रांत महार्ध करून त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्यादिवशी उपवास करावा. सत्पात्रांस आहारदान द्यावें, ब्रम्हचर्यपूर्वक धर्मध्यानांत काल घालवावा. दुसरे दिवशीं पूजा व दान करून आपण पारणे करावें. शक्तिप्रमाणे उपवासादिक करावें.
याप्रमाणें त्रेपन्न महिने त्याच तिथीत पूजा केली असतां उत्तम प्रकार होतो. तसेच सत्तावीस महिने मध्यम, त्रेपन्न दिवस जघन्य यांतील कोणत्याहि प्रकारें पूजा पूर्ण झाल्यावर याचे उद्यापन करावे. त्यावेळीं शांतिनाथविधान करून महाभिषेक करावा. चतुःसंघास आहा- रादि दानें द्यावींत. असा याचा विधि आहे.
– कथा –
उत्तम प्रकारानें-पूर्वी एका श्रीषेण नामक एका महाराजाने हे व्रत यथाविधि केले. त्यायोगे तो पुढे आपल्या दहाव्या मवांत शांतिनाथ तीर्थकर होऊन जन्मला. तो त्याकाळी पंचमचक्रवर्ति, सोळावा कामदेव, सोळावा पंचकल्याणाधिकारी तीर्थकर होता. पुष्कळ काल अनेक भोगोपभोग वस्तूंचा ऐश्वर्यांचा अनुभव घेऊन शेवटीं त्याने जिनदीक्षा घेतलो, तपःप्रभावाने सर्वकर्माचा नाश करून तो मोक्षास गेला. तेथे निरंतर शाश्वत सुख अनुभं लागला. तो आम्हांस शांति देवो. असा याचा दृष्टांत आहे, श्रेणिकराजा चलनाराणी यांचीच कथा येथे घ्यावी.