व्रतविधि– आषाढ मासांतील अष्टान्हिकांत या व्रतधारकांनीं शुचिजलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्त्रे धारण करावीत. सर्व पूजाद्रव्ये बरोबर घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रद- क्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. पीठावर चोत्रीस तीर्थकर प्रतिमा यक्षयक्षीसह स्थापून तिला पंचामृतांनीं अभिषेक करावी. अष्टद्रव्यांनीं त्यांची अर्चना करावी. श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रह्मदेव यांचे अर्चन करावें. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं चतुर्विंशतितीर्थंकरेभ्यो यक्ष- यक्षीसहितेभ्यो नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुष्पे घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. महार्घ्य करून त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगला- रती करावी. सत्पात्रांस आहारदान द्यावे ब्रह्मचर्यपूर्वक धर्मध्यानांत काल घालवावा.
या प्रमाणे आषाढ शु. ८ पासून दहा १० दिवसपर्यंत पूजा करून एकमुक्ति करावी. पुढे १० दिनस पूजा करून एकाच वस्तूने एकाशन करावे. नंतर १० दिासपर्यंत पूजा करून रसपरित्याग करावा मग दहा दिवस पूजा करून वस्तुपरिसंख्यान करावे. पुनः दहा पूजा करून फलाहार करावा. पुढे १० दिवस पूजा करून कांजि- काहार करावा. नंतर दहा दिवस पूजा करून अर्धाहार करावा. मग दहा दिवस पूजा करून अन्नाचे दहा आस घ्यावेत. नंतर दहा दिवस धारणा पारणा करावी. त्यानंतर दहा दिवस उपवास करावा. या विधीने १०० दिवसामध्ये दें दशपर्व त्रत पालन करावे. शेवटी याचे उद्यापन करावे. त्यावेळी चतुर्विशतितीर्थंकराराधना करून महाभिषेक करावा. दहा मुनीश्वरांना आडारदान देऊन १० पुस्तकें १० श्रुतवले जयमाला, पिछो, कमंडलु आवश्यक वस्तू याव्यात. असा याचा पूर्णविधि आहे.
– कथा –
पूर्वी है व्रत वज्रनाभि चक्रवर्ति राजांनीं यथाविधि केले होते. त्यायोगे ते पुढे आदिनाथ तीर्थकर झाले. असा दृष्टांत आहे. श्रेणिक राजा व चलना राणो यांचीच कथा येथे घ्यावी.